आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी कुंडली पाहण्यास जाताना कार अपघातात मुलगी, अाई मावशी ठार; ‘हिट अँड रन’ने शहरात संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  भरधावजाणाऱ्या स्काेडा कारने शुक्रवारी (दि. २६) पहाटे जाेरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात स्विफ्टमधील उपवधू, तिची आई आणि मावशी ठार झाली. पहाटे ५.३० वाजता गडकरी चौकात ही घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे, कारमधील भामरे कुटंुबीय सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे मुलीच्या लग्नासाठी कुंडली पाहण्यास जात होते. ‘हिट अँड रन’च्या या प्रकाराने शहरात संताप व्यक्त करण्यात येत अाहे. 
 
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील लीलाधर भामरे पत्नी सरिता आणि मुलगी योगिनी यांच्यासह रेल्वेने बुधवारी (दि. २४) रात्री नाशिकरोडला अाले. तेथून सातपूरच्या अशोकनगरमध्ये साडू प्रकाश पाटील यांच्याकडे मुक्कामासाठी थांबले. गुरुवारी पहाटे पाटील यांच्या स्विफ्ट कारने (एमएच १५ डीसी ०५२७) भामरे कुटुंबीय रेखा पाटील ब्राह्मणवाडे येथे जाण्यास निघाले. चांडक सर्कलमार्गे गडकरी चौकात आले असताना सीबीएसच्या बाजूने वेगात अालेल्या स्काेडा सुपर्ब कारने (एमएच ०१ एएल ७९३१) स्विफ्ट कारला धडक दिली. या धडकेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या योगिनी भामरे (वय १९), सरिता भामरे (वय ३८, रा. विद्यापीठ कॉलनी, जळगाव) आणि योगिनीची मावशी रेखा प्रकाश पाटील (वय ३६) या गंभीर जखमी झाल्या. पहाटेच्या शांत वेळी अपघाताचा माेठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. काही नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. योगिनीला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अन्य दोन महिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. दुर्दैवाने दोघींचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुढील सीटवर बसलेले लीलाधर भामरे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक मात्र बचावला. अपघातात ठार झालेल्या रेखा प्रकाश पाटील यांच्या पश्चात पती, एक मुलगा मुलगी असा परिवार अाहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातानंतर स्कोडाचालक फरार झाला. पोलिस त्याचा शाेध घेत आहेत. 

गडकरी चौकामध्ये यापूर्वीही चार अपघात : पहाटेसिग्नल बंद असल्याने शहरातून भरधाव वेगात वाहतूक सुरू असते. द्वारकाकडून येणारी वाहने मुंबईनाका, सीबीएसकडून येणाऱ्या वाहनांना दिसत नाही. त्यामुळे गडकरी चौकात नेहमीच अपघात घडतात. यापूर्वी गडकरी चौकात चार गंभीर अपघात घडले आहेत. 
 
पुढील स्लाइडवर सविस्तर बातमी...
 
बातम्या आणखी आहेत...