आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: वाढत्या तोट्याने आणखी 30 सिटी बस होणार कमी, प्रवाशांच्या अडचणीत भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरी प्रवासी वाहतुकीमुळे वाढता तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून बसफेऱ्या कमी करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. याच धोरणांतर्गत नोव्हेंबरअ महिन्यापर्यंत शहरी भागात धावणाऱ्या आणखी ३० बसेस कमी करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे आगामी काळात प्रवाशांच्या अडचणीत भर पडणार आहे. 
 
एसटी महामंडळाला शहरी प्रवासी वाहतुकीमुळे दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या तोट्यामध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरी प्रवासी वाहतुकीमुळे तब्बल साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा वा बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच शहरी मार्गावर धावणाऱ्या २२५ बसेसपैकी सद्यस्थितीत केवळ १३० बसेस धावत आहे. 
 
या वर्षाच्या अखेरपर्यंत यापैकी आणखी ४० बसेस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी १० बसेस दिवाळीच्या कालावधीत बंददेखील करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ३० बसेस नोव्हेंबर महिन्यापर्यंत बंद करण्यात येणार आहे. या दृष्टीने एसटी महामंडळाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. वाढत्या तोट्याचे कारण एसटी महामंडळाकडून शहरी बसेस संख्या कमी करण्यात येत असल्याने सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसेसची संख्या आणखी कमी केल्याने या अडचणीमध्ये भर पडणार आहे. 
 
सैनिकांच्या कुटुंबीयांच्या वाढल्या अडचणी 
भगूर,देवळाली कॅम्प परिसरात असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये सध्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. मात्र, या मार्गावरील काही बसफेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यंाना परीक्षेला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सैनिक कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या सैनिकी कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 
विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास 
बससंख्या कमी केल्याने उपलब्ध असलेल्या बसेसद्वारे प्रवाशांना जावे लागते. यात सर्वाधिक प्रवासी संख्या पासधारक विद्यार्थ्यांची आहे. यामुळे मिळेल त्या बसमधून जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना जावे लागते. महामंडळाच्या वतीने आणखी बसेस कमी करण्यात येणार असल्याने या अडचणीत आणखीच भर पडणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...