आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 30 Percent Salary Hike In Police Staff Chief Minister

पोलिस कर्मचा-यांना ३० टक्के वेतनवाढ : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अधिका-यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. पोलिसांना अद्यावत तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यासाठी प्रबोधिनीच्या माध्यमातून ई प्लॅटफार्म तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस कर्मचा-यांना एक टप्पा पदोन्नती देताना रिक्त जागा नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्याऐवजी ३० टक्के वाढीव वेतन देण्यात येईल’, अशी घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या १११ व्या प्रशिक्षणार्थी तुकडीतील ५४३ उपनिरीक्षकांचा दिक्षात समारंभ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. गृहराज्यमंत्री राम शिंदे, महासंचालक संजीव दयाळ, अपर पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम्, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल उपस्थित होते. यावेळी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार एकता चंद्रकांत पवार यांना देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व मानाची तलवार देऊन यशवंत बोरसे यांना सन्मानित करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, ‘गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेता अधिका-यांना अद्यावत तंत्रज्ञानाचे आणि नक्षलवाद, अतिरेक्यांविरुद्ध लढविण्यासाठी खडतर प्रशिक्षणाची गरज आहे.'