आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचा भंग करणार्‍या 30 रिक्षांवर जप्ती कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांबाबत ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या मालिकेची आरटीओ व पोलिसांनी दखल घेत बुधवारपासून कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईअंतर्गत शहरातील विविध भागांतील 30 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, 32 रिक्षांना मेमो देण्यात आला आहे.

मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, दिलीप शिंदे, दीपाली जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुक्तार मनियार, श्रीकृष्ण गिते, राजेश जगताप, राजेंद्र पाटील व संजय डहाळे यांच्या पथकाने बुधवारी सकाळपासून रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम राबविली. फ्रंटशीट, हूडचा रंग, फॅन्सी नंबरप्लेट, साइड बार नसलेल्या व नियमांचा भंग करणार्‍या रिक्षांवर दंडात्मक, जप्ती व मेमोची कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे मग्रुर रिक्षाचालकांची मात्र चांगलीच धावपळ झाली.