आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रधानमंत्री अावास’साठी 30 हजार अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे योजनेतून हक्काचे छत मिळवण्याकरिता महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमधील अर्जदारांची गर्दी संपता संपत नसून, अातापर्यंत जवळपास ३० हजार अर्ज लाभार्थ्यांनी नेले अाहेत. 
 
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण मागणी सर्वेक्षण अर्ज घेण्यासाठी जवळपास अाठवड्यापासून महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी उसळली अाहे. सकाळपासून गाेरगरीब स्लममधील रहिवासी घरासाठी रांगा लावून बसलेले अाहेत. प्रामुख्याने झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्यासाठी अर्ज मागवले जात असल्याची चुकीची माहिती पसरल्यामुळे गर्दीचा पूर अाला अाहे. 
 
विभागनिहाय अर्जांची विक्री 
महापालिकेच्यावतीने पहिल्या टप्प्यात २० हजार अर्जांची छपाई केली हाेती. त्यानंतर मागणी वाढल्यामुळे नाशिक पश्चिममध्ये ५९००, पंचवटीत ६६००, नाशिक पूर्व ५५१०, नाशिकराेड २६००, सातपूर ४७०० तर सिडकाेत ४६४६ अर्जांची विक्री झाली अाहे. 
 
यांना मिळणार घर 
प्रधानमंत्री आवास योजना तीन ते सहा लाख उत्पन्न असलेल्या घटकांसाठी अाहे. प्रत्यक्षात, ‘सर्वांना माेफत घर’ असा प्रचार झाल्यामुळे गर्दी वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. दरम्यान, योजनेसाठी महापालिकेकडून वीस रुपये अर्जाची किंमत निश्चित असली तरी काही दलाल मात्र २५० ते ३०० रुपयांत अर्ज विक्री करीत असल्याच्या तक्रारी अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...