आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक: पुढील पिढीसाठी महत्त्वाचा आणि अनमोल असा ठेवा असलेली पोथीपुराण, संदर्भ साहित्य आणि महत्त्वाच्या पुस्तकांना आता एक नवा लूक मिळणार आहे. नाशकातील जुन्या वाचनालयांमधील पोथ्यांचे जतन करण्याचे शास्त्रशुद्ध काम करणार्या अनिता जोशी याकरिता लवकरच डिजिटलायझेशन प्रकल्प हाती घेणार आहेत. यासाठी ग्रंथांची सरकारकडे नोंदणी करणेदेखील आवश्यक आहे.
यालाच प्रतिसाद देत आतापर्यंत नाशिकमधील तीनशे वर्षांपेक्षा जुनी 30 हजार हस्तलिखितांची नोंदणी सरकारकडे करण्यात आली आहे. ही हस्तलिखिते सार्वजनिक वाचनालय, एचपीटी महाविद्यालय यांसारख्या संस्था, तात्या शास्त्री गर्गे, यादवशास्त्री टकले, अंतुशास्त्री गायधनी आदी होऊन गेलेल्या विद्वानांच्या घरून प्राप्त झाली आहेत.
काय आहे पोथी संरक्षण
हा संस्कृती मंत्रालयाचा प्रकल्प असून, नाशिकात यासाठी केवळ अनिता जोशी या प्रकल्पाचे काम पाहतात. त्यांनी पुण्यातील भांडारकर संस्थेतून व लखनौ येथील नॅशनल रिसर्च लायब्ररी फॉर कन्झर्वेशनमधून तसेच भुवनेश्वर येथील ओरिसा आर्ट कन्झर्वेशन सेंटरमधून याचे शिक्षण घेतले आहे. माहिती नोंदणी आणि जतन अशी दोन प्रकारची कार्ये यामार्फत चालतात. हस्तलिखितांबरोबरच इतर प्रिंटेड पुस्तकांसाठीदेखील जतन करणे गरजेचे आहे. गजआयुर्वेद, हस्तआयुर्वेद आदी उपयुक्त ग्रंथ यात येतात. पोथ्यांचे डॉक्युमेंटेशन केल्यानंतर संगणकीकरण केले जाते. www.namami.org या संकेतस्थळावर हे संकलन दिसेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.