आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थातील रस्त्यांची मदार ३०० कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या ९३ किलोमीटर रस्त्यांच्या कामांपैकी जेमतेम ३५ किलोमीटरचीच कामे आतापर्यंत पूर्ण झाल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पाहणीत उघड झाले आहे. सर्व रस्ते मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान बांधकाम खात्यापुढे असले तरी, त्याच्या पूर्ततेसाठी ३०० कोटी रुपयांची गरज असल्याने केंद्राच्या निधीची प्रतीक्षा आहे.

शहरात जुन्या रस्त्यांचे नूतनीकरण, रुंदीकरण रिंगरोडची कामे सुरू आहेत. ९३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ४६२ कोटी ५० लाख रुपये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजूर केले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता मे महिन्यात संपल्यावर कामे जाेरात सुरूही झाली. मात्र, मध्यंतरी पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्यावर तसेच राज्य सरकारनेही १०५२ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी ७०० कोटी उभारण्याची जबाबदारी पालिकेवर साेपवल्यावर रस्त्यांच्या कामांची गती मंदावली. ठेकेदारांची देयके मंजूर होत नसल्यामुळे त्याचा परिणाम कामावर झाला. परिणामी, मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होण्याची मुदत असलेली कामे सद्यस्थितीत जेमतेम ३० टक्केच पूर्ण झाली आहेत. आयुक्तांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाल्यावर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख अडचण निधीचीच असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, डॉ. गेडाम यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अशोक स्तंभ ते रविवार कांरजा, रामकुंड परिसर, इंद्रकुंड, औरंगाबादरोड, तपोवन परिसर, साधुग्राम, टाकळीरोड, पाथर्डी येथील कामांची पाहणी केली. शहर अभियंता सुनील खुने अधिकारी उपस्थित होते.

मंजूर निधी - ४६२ कोटी ५० लाख शंभर कोटींची कामे
मार्चपर्यंतसर्व रस्ते पुलांची कामे पूर्ण करण्याचे िनयोजन आहे. आतापर्यंत जवळपास १०० कोटींची कामे झाली असून, साधारण ३०० कोटींच्या निधीची उर्वरित कामासाठी गरज आहे. सुनीलखुने, शहरअभियंता, महापालिका

पूलही अडचणीत
२४कोटी रुपयांचे चार पूल बांधले जाणार असून, त्यात १२० मीटरचे तीन, तर ७५ मीटरचा एक पूल बांधला जाणार आहे. सिंहस्थासाठी जेमतेम दहा महिने बाकी असताना त्यातील तीन कामे निविदा स्तरावर असून, त्यांची रक्कम १८ कोटी रुपयांपर्यंत आहे.