आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 Rupees For Interview In Urban Cooperative Society

मुलाखतीसाठी ३०० रुपये, तक्रार करणा-यांचे पैसे परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - येथील हरिओम ग्रुपच्या ढाेकेश्वर मल्टिस्टेट अर्बन काे. आॅप. क्रेडिट साेसायटीच्या विविध शाखांत नाेकरी मिळावी म्हणून मुलाखतीसाठी तीनशे रुपये घेण्याचा प्रकार रविवारी लासलगावात घडला. तसेच, मुलाखती वेळी तीन ते पाच लाख रुपयांची मुदतठेव पावतीही लगेच अामच्याकडे करावी लागेल, अशा तोंडी तक्रारी येथे अालेल्या बेराेजगार तरुणांनी केल्या. काही तरुण येथील पाेलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेल्यानंतर त्यांना संबंधितांनी तीनशे रुपये परत देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोसायटीच्या व्यवस्थापकांशी याबाबत विचारणा केली असता, त्यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळून उद्या खुलासा करणार असल्याचे सांगितले. येथील स्टेशनराेडवरील सोसायटीच्या कार्यालयाबाहेर राज्यातील विविध जिल्ह्यांतील तरुण मुलाखतीसाठी आले हाेते. त्यात महिला उमेदवारांचाही समावेश हाेता.
मुलाखतीपूर्वी नाेंदणी अर्ज भरून प्रत्येकी तीनशे रुपये जमा करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मुलाखत दिलेल्या उमेदवारांनी तीन ते पाच लाखांची मुदतठेव पावतीची मागणी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही उमेदवारांनी मुलाखत देताच परतीची वाट धरली. काहींनी पैसे भरून मुलाखत देता पाेलिस ठाण्यात ताेंडी तक्रारी केल्या. पाेलिसांनी सोसायटीशी संपर्क केल्यानंतर संबंधितांनी या उमेदवारांना बोलावून त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले.
याशाखांसाठी होती भरती :मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, काेल्हापूर, साेलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, अाैरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकाेला, जळगाव, नांदेड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद तसेच नाशिक जिल्ह्यातील एकाेणतीस गावे. दहा ते चाळीस हजारांपर्यंत पगार देण्याची हमी देत जाहिराती दिल्या होत्या.

अामच्याकडे करावी लागेल, अशा तोंडी तक्रारी येथे अालेल्या बेराेजगार तरुणांनी केल्या. काही तरुण येथील पाेलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेल्यानंतर त्यांना संबंधितांनी तीनशे रुपये परत देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोसायटीच्या व्यवस्थापकांशी याबाबत विचारणा केली असता, त्यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळून उद्या खुलासा करणार असल्याचे सांगितले. येथील स्टेशनराेडवरील सोसायटीच्या कार्यालयाबाहेर राज्यातील विविध जिल्ह्यांतील तरुण मुलाखतीसाठी आले हाेते. त्यात महिला उमेदवारांचाही समावेश हाेता.
मुलाखतीपूर्वी नाेंदणी अर्ज भरून प्रत्येकी तीनशे रुपये जमा करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मुलाखत दिलेल्या उमेदवारांनी तीन ते पाच लाखांची मुदतठेव पावतीची मागणी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही उमेदवारांनी मुलाखत देताच परतीची वाट धरली. काहींनी पैसे भरून मुलाखत देता पाेलिस ठाण्यात ताेंडी तक्रारी केल्या. पाेलिसांनी सोसायटीशी संपर्क केल्यानंतर संबंधितांनी या उमेदवारांना बोलावून त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले.
याशाखांसाठी होती भरती :मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, काेल्हापूर, साेलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, अाैरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकाेला, जळगाव, नांदेड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद तसेच नाशिक िजल्ह्यातील एकाेणतीस गावे. दहा ते चाळीस हजारांपर्यंत पगार देण्याची हमी देत जाहिराती दिल्या होत्या.

पैशांची मागणी
मुलाखती आधीच तीनशे रुपयांची मागणी केली जात असल्याने मुलाखत दिली नाही. काही महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या असता, त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी झाली. प्रदीपसाळुंके, उमेदवार, नाशिक
सोसायटीविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार.
सोसायटीबाहेर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी असा मंडप टाकला होता.