आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३१ हजार नाशिककरांनी भरली ऑनलाइन घरपट्टी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाॅनलाइन पद्धतीने घरपट्टी भरणाऱ्यांसाठी अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विशेष याेजना यंदाच्या वर्षी जाहीर केली अाणि तिला पहिल्याच महिन्यात चांगला प्रतिसाद लाभला अाहे. या याेजनेचा फायदा गेल्या २३ दिवसांत तब्बल ३० हजार ९२२ नागरिकांनी घेतला अाहे. त्यातून महापालिकेच्या तिजाेरीत अातापर्यंत काेटी ३३ लाख रुपये महसूल जमा झाला अाहे.
गुरुवारी (दि. २३) सर्वाधिक म्हणजे ३२ लाख ८९ हजार इतका महसूल जमा झाला.
घरपट्टी वेळच्या वेळी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने माेठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, या प्रयत्नांना पूर्णत: यश मिळत नसल्याने महापालिकेला अार्थिक फटका बसताे. ही बाब अाेळखून महापालिकेने महसूलवाढीसाठी अाॅनलाइन पद्धतीने घरपट्टी भरण्याची याेजना काही वर्षांपासून राबविण्याचे ठरविले.
महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये रांगेत उभे राहून घरपट्टी भरण्याला पर्याय म्हणून ही सेवा उपयुक्त हाेती. परंतु, तिला नागरिकांनी फारसा प्रतिसादच दिल्याने प्रशासनापुढे माेठा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरपट्टीसाठी नवीन याेजना जाहीर केली.

यंदा १.८२ काेटींची अधिक वसुली
अाॅनलाइन पद्धतीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात काेटी ५१ लाख रुपये घरपट्टी वसुली झाली हाेती. यंदा ती काेटी ३३ लाख झाली अाहे. म्हणजे नव्या याेजनेमुळे काेटी ८२ लाख वसुली अधिक झाल्याचे स्पष्ट झाले.
अशी भरा अाॅनलाइन पद्धतीने घरपट्टी
ऑनलाइन घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेच्या निर्धारित संकेतस्थळावर गेल्यास तेथे अाॅनलाइन युटिलिटी नावाचा पर्याय येताे. त्यात प्राॅपर्टी टॅक्स या पर्यायाला क्लिक केल्यास तेथे इंडेक्स नंबर टाकून घरपट्टी भरता येते.
उच्चभ्रू वसाहतींत याेजनेचा सर्वात कमी लाभ
उच्चभ्रूलाेकांची वसाहत म्हणून समजल्या जाणाऱ्या काॅलेजराेड, गंगापूरराेड, कॅनडा काॅर्नर, महात्मानगर अादी भागात इंटरनेटचा माेठ्या प्रमाणात वापर केला जाताे. मात्र, या भागाचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात रहिवाशांनी अाॅनलाइन व्यवस्थेचा इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी लाभ घेतल्याचे पुढे अाले अाहे, तर कामगारांची वसाहत म्हणून अाेळख असलेल्या सिडकाे परिसरातून अाॅनलाइन पद्धतीने सर्वाधिक घरपट्टी भरण्यात अाली अाहे.
अशी झाली वसुली
६७८२ पूर्व
३००० पश्चिम
२६३१ पंचवटी
३११९ सातपूर
४६१० नाशिकराेड
१०७८२ सिडकाे