आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 केबल चालकांचे प्रक्षेपण प्रशासनाकडून बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - करमणूक कर न भरलेल्या 32 केबल चालकांचे प्रक्षेपण जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री बंद केले. तसे आदेश मल्टी सिस्टिम ऑपरेटर यांना तहसीलदार गणेश राठोड यांनी दिले. शनिवारी सकाळपासून त्याचा परिणाम दिसेल, असे राठोड यांनी सांगितले.

डॅश प्रणाली लागू केल्यानंतर केबलचालक, एमएसओ आणि करमणूक कर विभाग यांच्यात कलगीतुरा रंगला. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर 70 पेक्षा अधिक केबल चालकांनी न्यायालयात कर भरला, तर 270 चालकांनी प्रशासनाकडे कर भरला. मात्र, 32 चालकांनी कर न भरल्याने अपर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे प्रक्षेपण बंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तहसीलदार राठोड यांनी शुक्रवारी सायंकाळी संबंधितांचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिले.