आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 32 CCTV Camera's And 15 Police Station Will Be On The PuneRoad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियोजन सिंहस्थाचे: पुणेरोडवर येणार ३२ सीसीटीव्ही; १५ पोलिस चौक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात पहिल्या पर्वणीच्या दिवशी पुणेरोडने येणाऱ्या भाविकांसाठी पर्यायी स्नान आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी पुणेरोड सेक्टरच्या नियोजन आणि बंदोबस्ताची माहिती पोलिस उपआयुक्त पंकड डहाणे यांनी दिली.
पहिल्या पर्वणीला पुणेरोडमार्गे सुमारे २५ टक्के भाविक येण्याची शक्यता आहे. पुणे मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची व्यवस्था चिंचोली-मोहगावरोडवर करण्यात आली आहे. येथेच सर्व प्रकारची वाहने थांबवून एसटी महामंडळाच्या बसने भाविकांना शहरात प्रवेश दिला जाणार असून, भाविकांना ५.७६ कि.मी. पायी जावे लागणार आहे. पर्वणीच्या वेळीच स्नान करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी द्वारका कन्नमवार घाट आणि दसक घाटावर स्नानासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. रामकुंड येथे स्नान करू इच्छिणारे भाविक दुपारी १२ नंतर शहरात पायी जाऊन स्नान करू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
सर्वच रस्त्यांवर सुमारे हजार ५०० मी. बॅरिकेडिंग मार्गावर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे असतील. भाविकांच्या सुरक्षेसाठी १५ पोलिस चौक्या असतील. पुणे-चेहेडी जकात नाका येथे निवाराशेड, सेंट फिलोमिना शाळा येथे होल्डिंग स्पॉट असेल. आपत्कालीन स्थितीत ते हजार भाविक येथे थांबू शकतील. निवाराशेडमध्ये १० ते १२ हजार जण राहण्याची क्षमता आहे.

मार्गावर विविध ठिकाणी ८८ ध्वनिक्षेपण भाविकांना मदत सूचना करतील. हिंदी आणि तामीळ, तेलगू आदी भाषा येणाऱ्या नाशिकरोड परिसरातील स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नांदूरनाका-दसकमार्गे बाहेर पडण्याचा मार्ग ठेवला आहे.
नियोजनामध्ये त्रुटी नाहीत
- पुणे रोड मोठा मार्ग आहे. या मार्गावर पर्यायी स्नान व्यवस्थेस पार्किंग सुविधांचे नियोजन पूर्ण झाले आहे.
पंकड डहाणे, पोलिस उपआयुक्त, सिंहस्थ सेल
असे आहे नियोजन

पुणे सेक्टर मार्गावर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, तीन वॉच टॉवर आणि पंधरा पोलिस चौक्या. यातील चार कायमस्वरूपी आहेत. सात तात्पुरत्या आहेत.
बॅरिकेडिंग नियोजन : सुमारे५५०० मी. सर्व परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेडिंग लावण्यात येईल. एकही भाविक इतर मार्गाने शहरात येणार नाही. ८८ ध्वनिक्षेपणांची २४ तास सेवा उपलब्ध ठेवणार आहे.
पार्किंग नियोजन : चिंचोली-मोहगावयेथील ३० हेक्टर जागेवर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येथून एसटी बसने शहरात आणि तेथून ५.७६ कि.मी. पायी स्नानाकरिता जाता येईल.
वॉचटॉवर : देशातील विविध भागांतून सिंहस्थ कुंभमेळा काळात शहरात येणाऱ्या भाविकांसह इतर बाबींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर (टेहळणी मनोरे) उभारण्यात येणार आहेत.
निवारा शेड: भाविकांसाठीचेहेडी नाका परिसरात निवाराशेड असेल. येथे १० ते १२ हजार भाविक राहू शकतील, तर आपत्कालीन स्थितीत सेंट फिलोमिना शाळेत पर्यायी जागा असेल.