आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक नियंत्रण: मुंबई-आग्रा महामार्गावर बसविणार ३४ सीसीटीव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील पोलिस बंदोबस्तासह भाविक मार्गाचे नियोजन पूर्ण झाले आहे. सिंहस्थ पर्वणीकाळात उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णता बंद ठेवण्यात येणार आहे. एसटी बसने भाविकांना शहरातील पार्किंग ठिकाणावर सोडण्यात येणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या मार्गाच्या नियोजनाची माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्यात मुंबईकडून किमान सर्व भाषिय २२ टक्के भाविक येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी राजूर बहुला, विल्हाेळी, जैन मंदिर येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून १८.५ कि.मी. भाविकांना एसटी बसने शहरातील इतर पार्किंगकडे येण्याची सुविधा असणार आहे. उड्डाणपुलावरील इतर वाहतूक पर्वणी काळात बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाहून फक्त एसटी बसला प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई नाका, वडाळानाका, द्वारका टाकळी फाटा, तिगरानिया कॉर्नरपासून कि.मी. भाविकांसाठी मार्ग असणार आहे.
अापत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पखालरोडमार्गे भाविक मार्ग वळविण्यात येणार आहे. पर्वणीकाळात वेगळा प्रशासकीय मार्गदेखील निर्माण करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन कायमस्वरूपी आणि तीन तात्पुरते टॉवर बसवले जाणार आहेत. अकरा पोलिस चौक्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. १४ ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेेरे लावण्यात येणार आहेत. साडेपाच कि.मी. रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही तैनात
मार्गावरील१४ ठिकाणांवर ३४ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासह १५८ ध्वनिक्षेपक भाविकांच्या मदतीसाठी २४ तास सुरू राहणार आहेत. ५.५० कि.मी. रस्त्यावर पूर्णत: बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.
फलकपडणार उपयोगी
रस्त्यावर जागोजागी १५६ दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. ५२ ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. यावर इच्छित ठिकणांसह पोलिसांच्या हेल्पलाइनची माहिती असणार आहे.
अकरा पोलिस चौक्या
मुंबई-आग्रामहामार्गावर अकरा पोलिस चौक्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. तीन कायमस्वरूपी, अाठ तात्पुरत्या असणार आहेत. दोन ठिकाणी कायमस्वरूपी, तर तीन ठिकाणी तात्पुरते वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत.
वाहनांसाठी पार्किंग
राजूरबहुला, विल्होळी, जैन मंदिर येथे सुमारे ७२ एकर जागा पार्किंगसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. १० हजार वाहने थांबण्याची क्षमता आहे.
भाविकांसाठी निवारा शेड
मुंबईमार्गाहून किमान २२ टक्के भाविक येण्याची शक्यता आहे. विल्हाेळी, ट्रक-टर्मिनल येथे ३५ हजार लोकांसाठी निवाराशेड निर्माण करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...