आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर-जी लाइन्ससाठी हवा स्वतंत्र टनेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रिलायन्सच्या फोर-जी सेवेसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून, त्यासाठी खोदकाम केले जात आहे. भविष्यात अन्य दूरसंचार कंपन्यांकडूनही याचप्रकारे केबल्स टाकण्यात येणार असल्याने पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत. वारंवार होणारा हा त्रास कायमस्वरूपी बंद होऊन महापालिकेलाही नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, यासाठी केबल टनेल टाकण्याची मागणी पुढे आली आहे.

शहरातील ईएसडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी यासंदर्भातील निवेदनही महापालिका आयुक्त संजय खंदारे यांना दिले आहे.रिलायन्सकडून देशभरात फोर-जी सेवा दिली जात असून, या प्रकल्पातील पायलट सिटी म्हणून नाशिकची निवड करण्यात आली आहे. फोर-जी सुविधा घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी रिलायन्सकडून प्रयत्न केले जात असून, त्यासाठी रस्त्यांच्या कडेला खोदकाम करून केबल टाकल्या जात आहेत. या खोदकामाच्या बदल्यात महापालिकेला कोट्यवधींची नुकसान भरपाईही मिळणार असून, त्यातच रस्त्यांची कामेही नव्याने केली जाणार आहेत. भविष्यात बीएसएनएल, आयडिया, व्होडाफोन यांसारख्या इतर कंपन्यांकडूनही याचप्रकारच्या सुविधेकरिता रस्ते खोदले जातील. त्याचा त्रास शहरवासीयांना भोगावा लागणार आहे. तो टाळण्याकरिता हे केबल टनेल कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहे.

अशी आहे संकल्पना
जमिनीतून केबल टनेलचे काम होते. त्यासाठी विशिष्ट व्यासाची पाइपलाइन टाकली जाते. यातून दूरसंचार कंपन्यांना विना खोदकाम आपल्या केबल्स पसरविता येतात. शिवाय महापालिकेला प्रति किलोमीटरप्रमाणे कंपन्यांकडून भाडेही मिळते. मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या शहरांत या प्रकारची सुविधा महापालिकांनी उपलब्ध करून दिली आहे.

कुंभमेळा ठरेल संधी
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विकासकामे सुरू होत आहेत. रस्ते बांधणीची होती. यातच टनेलचे काम झाले तर त्याचा खर्चही कमी येईल व दीर्घकालीन सुविधा उपलब्ध होईल. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉर्मस