आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरगाणा तालुक्यात 4 लाखांचे मद्य जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सुरगाणा तालुक्यातील करंजुल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून दमण निर्मित विदेशी मद्याचे 107 बॉक्ससह सुमारे सव्वा चार लाखांचा माल जप्त केला. दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.


जॉन मार्टिन व्हिस्की मद्याच्या 180 मिलिच्या 2256 बाटल्या, किंग फिशर बिअरच्या 650 मिलिच्या 720 बाटल्या टेम्पो (एमएच 13, एन 4335) जप्त केला. अभिमन पवार व प्रकाश चौधरी यांना अटक केली आहे. अधीक्षक जे. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एम. माळी व सहकार्‍यांनी केली.