आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार पाेलिस ‘सुभेदारांवर’ होणार बडतर्फीची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  वर्षानुवर्ष पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून विविध पोलिस ठाण्यामध्ये ‘सुभेदारी’ गाजवणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध धंद्यावाल्यांशी अणि शहरातील इतर अवैध धंद्याशी असलेले ‘अर्थ’पूर्ण संबधाचा पर्दाफाश झाल्याचे चार कर्मचाऱ्यासह एक निरिक्षकास थेट बडतर्फ करण्याच्या हलचाली गतीमान झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 
 
पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात सुभेदारी गाजवणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या अवैध धंद्यावाल्यांशी असलेले संबधाचे बिंग फुटले असून या कर्मचाऱ्यांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करता थेट बडतर्फ करण्याची कारवाई सुरु असल्याचे माहिती पुढे आली आहे. आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केलेल्या गोपनीय चाैकशीमध्ये हे कर्मचारी दोषी अढळले आहेत. या कर्मचाऱ्यांना म्हणने माडंण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे थेट अवैध धंद्यावाल्याशी संबध उघड झाले आहे. लोकप्रतिनिधींशी सूत जुळवून घेत पोलिस आयुक्त ते वरिष्ठ निरिक्षकपदी काेणाला बसवायचे याचे सेटींग हे सुभेदार करत असल्याची चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरु आहे. तत्कालीन पाेलिस आयुक्त सरंगल यांनी प्रथम ही साखळी तोडत दोन कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली. याचीच पुनरावृत्ती सध्याचे आयुक्त करत आहेत. या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करता थेट बडतर्फ करण्याच्या हलचालीचे वृत्त आहे. यात अंबड, इंदिरानगर, गुन्हे शाखा मोटर वाहन विभागातील सुभेदारांसह वरिष्ठ निरिक्षकाचा समावेश आहे. 

वरिष्ठ निरीक्षकांना कारवाईतून इशारा 
या कारवाईमुळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्तांनी या कारवाईतून थेट वरिष्ठ निरीक्षकांना इशारा दिल्याने पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चार कर्मचाऱ्यांवर कारवाईनंतर आता पुढे कोण याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये अाहे. 
बातम्या आणखी आहेत...