आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुहूर्ताला कापूस दर 4 हजार रु. क्विंटल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मान्सूनपूर्व कापसाचा हंगाम सुरू झाला असून, बुधवारी (९ सप्टेंबर रोजी) एदलजी जिनिंगमध्ये खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या या कापसाला 4 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

जिल्ह्यात बागायत पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी करण्यात येते. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या या कपाशीचा कापूस निघणे सुरू झाले आहे. आज खासगी कापसाचा शुभारंभ करण्यात आला. एदलजी जिनिंग येथे पथ्रोट येथील शेतकरी नाना ठाकरे यांनी आज मुहूर्तावर ३० िक्वंटल कापूस विक्रीसाठी आणला होता. खरेदीदार राजू पमनानी यांनी या कापसाची खरेदी केली. कापसाला हजार रुपये दर मिळाला. नवलकिशोर मालपाणी यांच्या हस्ते कापसाच्या गाडीचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर पूजन करण्यात आले. या वेळी अडते नवलकिशोर मालपाणी, खरेदीदार राजू पमनानी, शेतकरी नाना ठाकरे आदी उपस्थित उर्वरितपान

कपाशीचे क्षेत्र घटले
जिल्ह्यातमागील वर्षाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सरासरी दहा हजार हेक्टरने घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र लाख ९६ हजार ५२५ हेक्टर होते. या वर्षी मात्र यात घट होऊन ते लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर आले. मागील वर्षी कपाशीला सरासरी चार हजारपेक्षाही कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादन परवडेनासे झाले. त्यामुळे या वर्षी कपाशीच्या क्षेत्रात घट झाली.