आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याकाठी 40 जोडपी होताहेत विभक्त, व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबात तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवनाच्या सुखद प्रवासाला विवाहापासून प्रारंभ होत असला तरी अाधुनिक काळात घटस्फोटाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची धक्कादायक बाब कौटुंबिक न्यायालयात दाखल दाव्यांच्या संख्येवरून उघडकीस आली आहे. 
 
यामध्ये  कालानुरूप विभक्त होण्याचे प्रमाण वाढत असून, न्यायालयात पती-पत्नीमध्ये वादाचे प्रकरण २०१४ मध्ये १५०६ दावे  तर २०१५ मध्ये १५८३ आणि २०१६मध्ये हीच संख्या १८६२ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, या दाखल दाव्यांमध्ये एकमेकांच्या सहमतीनुसार घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून, २०१५ मध्ये ३४४ तर २०१६ मध्ये ४७३ आणि यंदाच्या वर्षात अवघ्या दोन महिन्यांत ८० जोडपी विभक्त झाली अाहेत. न्यायालयात २०१६ मध्ये २६३० खटले प्रलंबित आहेत. 
 
व्यस्त जीवनशैली कामाच्या बदललेल्या स्वरूपामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. परस्पर विश्वासाने यावर तोडगा काढला जातो. मात्र, बऱ्याचदा दोघेही अपेक्षा पूर्ण करण्यात कोठेतरी कमी पडतात. यामुळे अशी जोडपी घटस्फोटाचा मार्ग निवडतात.
 
याशिवाय, घटस्फोट हाेण्यास अनेक कारणे अाहेत. विवाहानंतर सुरुवातीच्या काळात स्त्रिया अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पस्तीशीनंतर मात्र त्या कंटाळतात. त्यागाचे आयुष्य जगणे त्यांना असह्य होत असल्याने निराशेतून घटस्फोटाचा मार्ग निवडत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोशल मीडिया अतिरेकामुळेही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव अाहे. 
 
विश्‍वासाने तोडगा शक्‍य 
वाढते घटस्फोटचिंताजनक आहे. विवाहित व्यक्तीने परस्परात येणाऱ्या दुराव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. स्वभावांची ओळख असायला हवी. गुणदोषांची जाणीव असणे गरजेचे आहे. विवाहपूर्व समुपदेशनाने परस्पर विश्वासाने तोडगा शक्य, त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण नियंत्रणात येईल. -अॅड. प्रेमनाथ पवार, सचिव, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन 
 
घटस्फोटाची कारणे 
शारीरिकछळ, व्यसन : शारीरिकछळ आणि मद्यपान नेहमी घडणाऱ्या गोष्टी आहेत. समाजाच्या कनिष्ठ स्तरापासून ते मध्यमवर्गीय, उच्चभ्रू समाजातही या समस्या आहेत. 
 
परस्परभिन्न व्यक्तिमत्त्व : विवाहम्हणजे लहान मुलांचा खेळ समजला जातो. तीन-चार महिन्यांनंतर दोघांना आपण भिन्न स्वभावाचे आहोत. त्यामुळे एकमेकांची आयुष्यभर साथ देणे त्यांना अशक्य वाटते आदी कारणे आहेत. 
 
विवाहबाह्य संबंध : जोडीदाराचेबाहेर कुणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण होऊन संबंध ताणले जातात. त्यातूनच हा मार्ग निवडला जातो. 
 
अवास्तव अपेक्षा : स्त्रियांनाआपला पती देखणा, रोमँटिक, काळजी घेणारा, समजूतदार तर पुरुषांना सुंदर, नाजूक, लाजाळू, भावनाशील, दोघांच्या स्वभावात भिन्नता असल्याने घटस्फोट होतात. 
बातम्या आणखी आहेत...