आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात सलग दुसऱ्या दिवशी पारा ४० अंशांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात मंगळवारी कमाल तपमानाची ४०.३ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याने एप्रिलच्या मध्यापर्यंत सलग दोन दिवस पारा ४० अंशांपेक्षा अधिक होता. सोमवारी कमाल तपमान हे ४०.६ अंश नोंदले गेले. त्यामुळे शहरवासीयांना वाढत्या तपमानाचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहरात आतापर्यंत सर्वाधिक उच्चांकी कमाल तपमान मे २००२ रोजी ४३.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
गत पाच वर्षांत २०१३ २०१५ मधील एप्रिल महिन्यात ४०.६ या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. तसेच, किमान तपमान २५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किमान आणि कमाल तपमानात तब्बल १५ अंश सेल्सिअसचा फरक पडला आहे. सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे येत्या आठवड्यात उन्हाच्या तीव्रतेसह ढगाळ वातावरण पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.