आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ४३,६२३ कुटुंबे शाैचालयांविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘स्मार्टसिटी’साठी कंबर कसणाऱ्या नाशिक महापालिका क्षेत्रात शौचालयांअभावी जवळपास ४३ हजार ६२३ कुटुंबांना प्रातर्विधीसाठी सार्वजनिक शाैचालयांत जावे लागत असल्याची विदारक बाब स्पष्ट झाली असून, जवळपास पाच हजार कुटुंबांना तर उघड्यावरच प्रातर्विधी उरकावा लागत असल्याचे समाेर अाले अाहे. अाराेग्य विभागाने अाता हागणदारीमुक्ती याेजनेतून संबंधित कुटुंबांना वैयक्तिक शाैचालय देण्याची तयारी सुरू केली अाहेे.

महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य मुले शाेधण्यासाठी माेठी माेहीम राबविण्यात अाली. जवळपास पाच हजार प्रगणक नेमून घराेघरी जाऊन प्रत्येक बालकाची माहिती घेण्यात अाली. त्याच वेळी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने वैयक्तिक शाैचालय काेणाकडे अाहे, याची माहिती घेण्यात अाली. त्यानुसार, शहरात जवळपास ४३ हजार ६२३ कुटुंबांकडे स्वत:ची शाैचालये नसल्याचे समाेर अाले. त्यानुसार, यातील ३८ हजार ६०२ कुटुंबे सार्वजनिक शाैचालयांचा लाभ घेतात, तर हजार २९ कुटुंबांना उघड्यावर शाैचालयासाठी जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करण्यात ही दारुण अवस्था अडचणीची ठरू शकत असल्याचे बघून अाता महापालिकेने सर्वांना वैयक्तिक शाैचालय देण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी सुरू केली अाहे.

४७०७
सिडकाे
५५२८
नाशिक पूर्व
५५२९
सातपूर
५८६९
नाशिक पश्चिम
१०,०१३
नाशिकराेड
११,९७७
पंचवटी

२१ हजार कुटुंबांना मिळणार वैयक्तिक शाैचालय
शासनाच्यासुवर्णमहाेत्सवी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा स्वच्छता याेजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात अनुसूचित जाती नवबाैद्ध घटकांच्या लाभार्थींच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले अाहे. या याेजनेंतर्गत लाभार्थ्यांना दहा टक्के हिस्सा भरून वैयक्तिक शाैचालये देण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. त्यानुसार, २१ हजार लाभार्थ्यांना याेजनेचा लाभ मिळू शकताे, असे अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी सांगितले. त्यासाठी लाभार्थ्यांना अर्ज दिले जाणार असून, शाैचालयासाठी स्वत:ची जागा अाहे का, याेजनेत सहभागी हाेण्याची तयारी अाहे का, अादी प्रश्न विचारले जाणार अाहेत.