आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग परिसरात तीन महिन्यांत अपघातात ४५ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असतानाच आता शहरातील रस्त्यांवरही गंभीर अपघात वाढू लागले आहेत. जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ४५ जणांचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. सन २०१४ मध्ये १७३, तर सन २०१५ मध्ये २३६ नागरिकांना जीव गमवावा लागला हाेता. महामार्गावरील होणाऱ्या रस्ते अपघातांपेक्षा ही आकडेवारी गंभीर आहे.
नवीन कॉलनी रस्ते, शहरांतर्गत रस्ते आणि इतर रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि झाडांमुळे अपघात घडले अाहेत. रस्त्यांवर असणाऱ्या धोकादायक चौफुल्या अपघातग्रस्त बनल्या आहेत. जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत १७३ अपघातांमध्ये १७३ मृत्यू झाले. यामध्ये पादचाऱ्यांचा समावेश आहे, तर जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षात २३६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांत ४५ नागरिकांचा विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात जीव गेला. ही आकडेवारी जिल्ह्यातील रस्ते अपघातांपेक्षा अधिक आहे. महामार्गावर यापूर्वी रस्ते अपघातात बळींची संख्या अधिक होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर अपघातात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलिस आयुक्तालयाच्या १३ पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे होतेय उल्लंघन
शहरातवेग मर्यादा राखली जात नाही. हेल्मेट नसणे आणि झाडांवर आदळून ठार होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यानेही अपघातांची संख्या वाढत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशी आहे आकडेवारी