आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. फार्मसीच्या जागा यंदा तब्बल ४८०ने वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- औषधनिर्माण क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज पाहता नाशिक जिल्ह्यातील चार नवीन महाविद्यालयांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे. एआयसीटीईची मान्यता मिळाल्याने २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षात फार्मसी पदविकेच्या २४० जागा वाढणार आहे. तर, विभागातील अहमदनगर धुळे येथील चार महाविद्यालयांनाही मान्यता मिळाली असून, त्यात २४० जागांची वाढ होणार आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
डी. फार्मसीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. मागील वर्षी तर राज्यभरात हजारो विद्यार्थी वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांनी नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव सादर केला आहे. एआयसीटीईकडून नाशिकमधील चार महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून, या शैक्षणिक वर्षात ती सुरू होणार आहेत. त्यामुळे फार्मसी पदविकेच्या जागांमध्ये वाढ होणार आहे.
ही कॉलेजेस होणार सुरू
नाशिकजिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी डी.फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार चारही महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून, त्यात त्र्यंबकेश्वर येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब इन्स्टिट्यूट ऑफ फार्समी, मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजसह अजून एक कॉलेज आणि कळवणमधील एका महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. या सर्व कॉलेजमध्ये प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता असल्याने २४० जागा वाढणार आहेत. तसेच धुळे नगरमध्येही चार महािवद्यालयांना मान्यता मिळाली आहे.
विभागातील महाविद्यालये उपलब्ध जागा
विद्याशाखा फार्मसी
नाशिक १२ (७०५)
धुळ 7 (४८०)
नंदुरबार 5 (३६०)
जळगाव १० (५८५)
अहमदनगर १० (६००)
एकूण ४४ (२७३०)
बातम्या आणखी आहेत...