आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरमध्ये 49 हजारांचा तांदूळ घोटाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पोषण आहार घोटाळ्याला पुष्टी देण्याजोगा प्रकार त्र्यंबकेश्वरमधील ब्राह्मणवाडे जिल्हा परिषद शाळेत उघड झाला असून, येथे जवळपास 49 हजार रुपयांचा तांदूळ व धान्य आदी माल गायब झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे.


ब्राह्मणवाडे शाळेतील पोषण आहार घोटाळ्यासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. 1 फेब्रुवारीला ग्रामस्थांनी शाळेचे कामकाजही बंद पाडले होते. माजी सभापती हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले. त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी व त्र्यंबक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी संयुक्त चौकशी केली. त्यात साठा नोंदवहीनुसार 31 जानेवारी 2014 व 3 फेब्रुवारी 2014च्या प्रत्यक्ष मोजणीत तफावत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


मुदतबाह्य साठा
14 लिटर सूर्यफुल तेल, नऊ किलो हळद व 42 किलो मिरची पावडरचा मुदत संपलेला साठाही शाळेत सापडला. शालेय पोषण आहारात इंधन व भाजीपाला यांचा पुरेसा वापर झाला नाही. पोषण आहार योजनेत शिक्षकांना सहभागी करून न घेता मुख्याध्यापकांनी स्वत:कडे सूत्रे ठेवली. नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केल्याचे आक्षेप घेण्यात आले.


धान्य गायब
13 लिटर सूर्यफुलाचे तेल तसेच 1.645 किलोचे जिरे असा 1500 रुपयांचा जादा माल आढळला. तर मोहरी, हळद, मिरची पावडर, तांदूळ, तूरडाळ, मसूर, मठ अशा जवळपास 49 हजारांच्या मालाचा हिशेबच लागला नाही.