आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरपदासाठी भाजपात ‘हम पांच’; बहुमतामुळे अाता गुणवत्ता, सचाेटीच हुकमी पत्ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अडीच वर्षांच्या महापाैरपदाचे दाेन्ही टप्पे सहज गाठता येणार असून, पहिल्या टप्प्यात अनुसूचित जमातीसाठी अारक्षित महापाैरपदासाठी भाजपकडून पाच प्रमुख दावेदार अाहेत. त्यात सर्वात अनुभवी चार वेळा निवडून अालेल्या रंजना भानसी या प्रबळ दावेदार असल्या तरी अन्य चाैघांचेही अाव्हान असणार अाहे. 
 
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे अाता महापाैरपदासाठी घाेडेबाजार जमवाजमवीचे अाव्हान राहाणार नाही. त्यामुळे भाजपातील महापाैरपदाच्या शर्यतीतील इच्छुकांच्या अाशा-अपेक्षा वाढल्या अाहेत. प्रामुख्याने भाजपत रंजना भानसी, प्रा. सरिता साेनवणे, सुरेश खेताडे, पुंडलिक खाेडे, रूपाली निकुळे हे प्रबळ दावेदार अाहेत. यात भानसी यांचा अनुभव दांडगा असून, भाजपची लाट असाे वा नसाे स्वत:च्या हिमतीवर त्या निवडून अालेल्या अाहेत. मात्र, भानसी यांना पक्षांतर्गत विराेधकही अाहेत. विशेष म्हणजे, त्यांचा अनुभव लक्षात घेता भविष्यात अामदार बाळासाहेब सानप यांनाच पंचवटी विधानसभा मतदारसंघात अाव्हान देण्याइतपत त्यांची ताकद वाढेल, अशी भीतीही विराेधाचे कारण ठरू शकेल. 
 
त्यानंतर सरिता साेनवणे या अामदार सानप यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतात. स्वत:च्या विश्वासातील महापाैर म्हणून साेनवणे यांना संधी मिळू शकते. याव्यतिरिक्त माजी नगरसेवक सुरेश खेताडे आणि पुंडलिक खाेडे हेदेखील या सर्व प्रक्रियेत प्रबळ दावेदार अाहेत. मनसेतून एेनवेळी भाजपत अालेले माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या पत्नी रूपाली निकुळे यांचाही विचार हाेऊ शकताे. 
 
पंचवटीकडेच पुन्हा महापाैरपद 
गेल्यावेळीअशाेक मुर्तडक यांच्या रूपात मनसेचा महापाैर झाला हाेता. यंदा महापाैरपदासाठी पंचवटीतील चार दावेदार असल्याने त्यात शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप हे स्वत:चा प्रभाव ठेवण्यासाठी मतदारसंघातच लाल दिवा अाणण्याची शक्यता लक्षात घेता पुन्हा पंचवटीचाच महापाैर हाेऊ शकेल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...