आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 मिनिटांत पाच सोनसाखळ्यांची लूट, पंचवटीमध्ये प्रयत्न फसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात ठिकठिकाणी हेल्मेटसक्ती माेहिमेसाठी माेठ्या प्रमाणात पाेलिस तैनात अाहेत. त्याचाच जणू फायदा गुन्हेगार घेत अाहेत. - Divya Marathi
शहरात ठिकठिकाणी हेल्मेटसक्ती माेहिमेसाठी माेठ्या प्रमाणात पाेलिस तैनात अाहेत. त्याचाच जणू फायदा गुन्हेगार घेत अाहेत.
नाशिक - हेल्मेटसक्तीसाठी शेकडाेंच्या संख्येने पाेलिसांचा फाैजफाटा रस्त्यावर उतरून धडक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र, याच हेल्मेटचा गैरवापर करीत भामट्या दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घालत केवळ पाचच मिनिटांत एकाच रस्त्यावरील अवघ्या दाेनशे ते तीनशे मीटर अंतरावरील महिलांच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावून पळ काढल्याच्या घटना घडल्या. तर याच भामट्यांनी पंचवटीत साेनसाखळी चाेरीचा केलेला प्रयत्न महिलेच्या सतर्कतने अयशस्वी ठरला. गुरुवारी (दि. १४) सकाळी कॉलेज रोडवर ६.४५ ते ६.५५ या वेळेत चार तर काठेगल्ली येथे वाजता अाणखी एक साेनसाखळी लुटीचा प्रकार घडला. एकपाठोपाठ घडलेल्या या सहा गुन्ह्यांनी लूटमार करणाऱ्या चाेरट्यांकडून उघड-उघड नाकाबंदीत तासन‌्तास वाहने तपासणी करणाऱ्या बीट मार्शलला अाव्हान देत वाकुल्याच दाखविल्या अाहेत. या घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
गुरुवारी (दि. १३) भल्या पहाटेच जाॅगिंगसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांनाच चाेरट्यांनी लक्ष्य केले. सकाळी ६.४५ ची वेळ, गंगापूरराेडवरील रहिवासी चंदा पुखराज जैन या कॉलेजरोडवरील बिग बाजार ते मर्चंट बँकेच्या रस्त्यावर फिरत हाेत्या. त्याचवेळी मागून दुचाकीवरून हेल्मेट घालून अालेल्या दाेघांनी जैन यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यांना काही समजण्याच्या अातच दाेघांनी पळ काढला. त्याच रस्त्यावर अवघ्या शंभर मीटर अंतरावर पुढे पायी जात असलेल्या मालती रामचंद्र फुलदेवरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चाेरट्यांनी खेचली. एवढ्यावरच थांबता दाेन्ही महिला अारडाअाेरड करून थांबत नाही ताेच या चाेरट्यांनी पुढे चालणाऱ्या पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी आणि उषा हरिभाऊ थेटे या दाेघींच्या एकापाठाेपाठ एक सोनसाखळी हिसकावून पलायन केले. अवघ्या पाच मिनिटांत चार लुटीच्या घटनांनी महिलावर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. या घटनास्थळावर पोलिस पोहाेचून नाकाबंदीचा फार्स करीत नाही ताेच पंचवटीतील श्रीकृष्णनगर येथे दूध घेण्यासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चाेरीचा प्रयत्न झाला. मात्र, संबंधित महिलेने प्रतिकार करताच चाेरट्याने पळ काढला. त्यानंतर काही मिनिटांतच तपोवनरोडमार्गे जाणाऱ्या शकुंतला रामकृष्ण पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र चाेरट्यांनी हिसकावले. ही घटना वाजेच्या सुमारास घडली. यावरून अवघ्या पंधरा मिनिटांतच पाच वृद्ध महिलांना लक्ष्य करत चाेट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे दिसले. 
 
गुडमॉर्निंग पथक झोपेत : एकाच रस्त्यावर सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चार सोनसाखळी चाेरीच्या घटना घडल्या. यावेळेत पोलिसांच्या गुड मॉर्निंग पथक झोपलेलेच हाेते की काय? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 
 
सातत्याचा अभाव : पोलिसांच्या कोम्बिंग अाणि नाकेबंदी कारवाईचा धडाका काहीकाळ सुरू हाेता. मात्र, काही दिवसांपासून सामाजिक उपक्रमांमधून उसंतच मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांना कारवाईचा विसर पडतो. विविध उपक्रम स्वागतार्ह असले तरी शहराच्या सुरक्षेसाठी कर्तव्यदक्षताही महत्त्वाची असून पाेलिसांचे नेमके प्राधान्य कशाला? गुन्हेगारी नियंत्रणाला की केवळ दंडवसुलीतून सामाजिक उपक्रमांना असाच प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 
 
पाच दिवसांत वाढले गुन्हे : गेल्यापाच दिवसांत घरफोडीचे ६, चोरी १४, हाणामारीचे खुनाच्या अशा गंभीर गुन्ह्यांची नाेंद झाली अाहे. 
 
टोळीबाबत माहिती, मात्र ठोस कारवाईची प्रतीक्षा 
गेल्यामहिन्यात ऑगस्ट राेजी अशाच प्रकारे एकाच वेळी चार साेनसाखळी चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. त्यापाठाेपाठ गणेशाेत्सवातही दरराेज घटना घडत असताना एकही चाेरट्याला पकडण्यात यंत्रणेला यश अाले नाही. याउलट यंत्रणा चाचपडतच दिसली. या घटनांवर नेहमीप्रमाणे पोलिसांकडून श्रीरामपूरचीच टाेळी सक्रिय झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात एकही चाेर पकडला जात नसल्याने क्राइम युनिट अाणि विशेष पथकेदेखील सुस्तावल्याचे बाेलले जात अाहे. 
 
‘इव्हेंट’चा धडाकाच गुन्हेगारांच्या पथ्यावर 
पोलिसआयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून वाहतूक जागृतीसाठी नो हॉर्न डे, हेल्मेटसक्ती, हेल्मेट वाटप, स्त्रियांना स्वसंरक्षणार्थ लाठी वाटप, सायकल फेऱ्या असाे की विविध सामाजिक उपक्रमांचा धडाकाच लावला जात अाहे. त्यातच हेल्मेटसक्तीसाठी उपअायुक्तांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते थेट शिपायांपर्यंत प्रत्येकालाच माेहिमेत उतरवून विक्रमी दंड वसूल करण्यात अाला. यांसारख्या उपक्रमांतच पाेलिसांचे बळ खर्ची पडत असून, या उपक्रमातच यंत्रणा अधिक व्यस्त दिसत असल्याने ही बाबच गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहे. 
 
आयुक्तांची पकड हाेतेय ढिली, अात्ममग्नतेतच धन्यता 
अायुक्त सिंगल यांच्या सुरुवातीचा काळ बघता सराईत गुन्हेगार असाे की राजकीय अाश्रय लाभणारे गुंड, त्यांना सळाे की पळाे करून साेडण्याची त्यांची कारवाई बघून त्याचे सर्वांकडून स्वागत झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली उपअायुक्त, सहायक अायुक्तांची कारवाईदेखील धडाकेबाज ठरली हाेती. मात्र, गेल्या दाेन महिन्यांचा कालावधी बघता गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरता ते पर्यावरणपूरक गणेशाेत्सव, हेल्मेट वाटप अशा उपक्रमांतच अधिक प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात. यंत्रणेच्या प्रमुखाला जे हवे, तेच त्यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी करणार, साहेबाला काेण सांगणार? अशीच भूमिका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने खरी परिस्थितीच समजत नसल्याचे दिसून येत अाहे. काही मंडळी त्यांची खुशमस्करी करीत, तुमचेच कसे बराेबर, असे म्हणत अायुक्तांवरच स्तुतिसुमने उधळत स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसतात. मात्र, दलाचे प्रमुखदेखील या गाेष्टींत अात्ममग्न राहण्याला पसंती देतात. 
बातम्या आणखी आहेत...