आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुढीपाडव्यापूर्वी गावाला प्लास्टिकमुक्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना 5 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राज्यातून प्लास्टिक कॅरीबॅगला बंदी घालण्यासाठी शासनाने दंडामध्ये २५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली परंतु, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता राज्यातून प्लास्टिकबंदीसाठी गुढीपाडव्यापासून कायदा लागू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायती गावाला पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करतील त्यांना विभागीय स्तरावर पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नाशिक येथे केली. 


महाराष्ट्र पर्यावरणीय अभियांत्रिकी प्रशिक्षण संशोधन संस्था (मित्रा) येथे शुक्रवारी प्लास्टिकबंदी धोरणाबाबत विभागीय आढावा बैठकीत कदम यांनी विभागातील अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तसेच त्यावर उपाय काय हे जाणून घेतले. कदम म्हणाले, देशातील १८ राज्यांमध्ये प्लास्टिकबंदी असून महाराष्ट्रामध्येही हा कायदा लागू होणार आहे. मात्र, हा कायदा सर्वानुमते असावा यासाठी अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. राज्यात ८० टक्के प्लास्टिक हे बाहेरील राज्यातून येत असून २० टक्के हे फक्त राज्यात तयार होते. राज्यात केवळ वृक्षलागवडीसाठी आग्रह धरला जातो. मात्र, ते जगविण्यासाठी कोणीही आग्रह धरत नसल्याचे पुढे आले आहे. यापुढे आता वृक्षलागवडीनंतर ते जगविण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामसभांमध्ये प्लास्टिकबंदीबाबत ठराव करण्यात यावे. तसेच मानवी आरोग्यासाठी प्लास्टिक हे हानिकारक असून, याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तेवढ्याच तीव्रतेने करणे ही प्रत्येक अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले. 


मंत्रालयापासून प्लास्टिक बाटली बंद 
राज्यातमंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्लास्टिकच्या बाटलीवर बंदी घालण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सर्वच कामे ही कायद्याने होत नसल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे. 


सीईओसाहेब, मराठीच बोला; तुम्हांला दंड का करू नये 
बैठकीतजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मिना हे आपले मत हिंदीतून मांडत होते. तेवढ्यात कदम यांनी त्यांचे बोलणे थांबवित तुम्ही हिंदीतून नाही तर मराठीतून बोला. यावेळी स्पष्ट मराठी येत नसल्याचे सांगत मीना यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी कदम यांनी तुम्हाला मराठी येत असूनही हिंदी बोलता, तर तुम्हाला दंड का करू नये असे सुनावले. 

बातम्या आणखी आहेत...