आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांमध्ये पाच रुग्ण दगावूनही ‘स्वाइन आटोक्यात’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एप्रिलमध्ये स्वाइन फ्लूमुळे १६, तर गेल्या चार दिवसांत पाच रुग्ण दगावले असतानाही महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. अार गायकवाड यांनी स्वाइन फ्लूचा प्रभाव कमी झाल्याचा दावा केला.
स्वाइन फ्लूवर नियंत्रण अाणण्यासाठी यंत्रणेला कामाला लावणे अावश्यक असताना प्रभाव नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे महापालिकेला या अाजाराविषयी गांभीर्यच नसल्याची बाब यातून स्पष्ट झाली अाहे.
जानेवारी २०१५ ते अाजतागायत शहरात स्वाइन फ्लूमुळे ३५ जणांचा बळी गेला. यात एप्रिलमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील पाच रुग्ण शहरी भागातील हाेते. जानेवारीपासून अातापर्यंत स्वाइन फ्लूचे ३०० रुग्ण दाखल झाले अाहेत. त्यातील २०० रुग्ण शहरातील १०० ग्रामीण भागातील अाहेत. ३०० रुग्णांपैकी २१९ रुग्णांचा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह अाल्याचे वैद्यकीय विभागाच्या अहवालातच स्पष्ट झाले अाहे.
दुसरीकडे, गेल्या चार दिवसांत स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण दगावले अाहेत. त्यातील दाेन शहरातील, तर तीन ग्रामीण भागातील अाहेत. अशा गंभीर परिस्थितीत स्वाइन फ्लू राेखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हाेणे अावश्यक असताना वैद्यकीय अधीक्षकांनी पत्रकारांशी बाेलताना स्वाइन फ्लूचा प्रभाव कमी झाल्याचे सांगितले.