आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी ट्रॅव्हल्सच्या पाच बस खाक, तपाेवनातील ही अाग कंत्राटावरून लावल्याचा संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - औरंगाबादरोडवरील जनार्दन स्वामी मठालगत एचएएल बस पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मातोश्री ट्रॅव्हल्सच्या पाच बस बुधवारी मध्यरात्री जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरीही या जळीतकांडामागे सराईत गुन्हेगारांचा हात अाहे की व्यवसायाच्या स्पर्धेतून ही घटना घडली, या दिशेने पाेलिसांनी तपास सुरू केला अाहे. अाडगाव पाेलिसांनी अाकस्मिक अागीची नाेंद केली असली तरी या घटनेमुळे शहरातील जाळपाेळीचे सत्र थांबविण्यात पाेलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे सिद्ध झाले अाहे.
याबाबत पाेलिस माताेश्री ट्रॅव्हल्सचे संचालक अानंद चाेरडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएएलच्या शेकडाे कर्मचाऱ्यांची दराराेज ने-आण करण्याचे कंत्राट नुकतेच एप्रिलपासून मातोश्री ट्रॅव्हल्सला मिळाले हाेते. त्यासाठी माताेश्रीच्या बसेस कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा सोडल्यानंतर औरंगाबादरोडवरील पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे सुमारे २५ ते ३० बस पार्किंगमध्ये उभ्या होत्या. मध्यरात्री वाजेच्या सुमारास त्यातील एम.एच. १५ इफ ८०१ या बसने अचानक पेट घेतल्याचे पार्किंगमध्ये सुरक्षारक्षकाच्या लक्षात अाले. त्याने तातडीने पोलिस अग्निशमन दलाला ही घटना कळविली. मात्र, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाेहोचेपर्यंत आगीने वेढलेल्या बसच्या लागूनच उभ्या असलेल्या चार ते पाच बस पेटल्या. काही क्षणातच अातील सीटचा माेठा भडका हाेऊन सर्व बस अागीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. एम.एच. १५ ए.के. १११५, एम. एच. १५ इ. एफ. ४५०, एम. एच. १५ इ. एफ. ०४५९, एम. एच. १५ इ. एफ. ०५५९ या चारही बस पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. अग्निशमन दलाच्या बंबांनी इतर बस विझविण्यासाठी मदत केली. आगीचे कारण दिवसभरात स्पष्ट झाले नसले तरीही पोलिस सर्व बाजूने तपास करीत असल्याचे अाडगाव पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र काहीही हाती लागले नाही.

चालकाचे प्रसंगावधान : पार्किंगमध्ये२५ ते ३० बस एकाशेजारी एक अशा रांगेत उभ्या केलेल्या होत्या. एकामागोमाग एक बस आगीच्या विळख्यात सापडल्या जात असल्याचे लक्षात येताच, सुरक्षारक्षकाने तातडीने तेथील एका बसचालकाला बाेलावून घेत त्याच्या मदतीने अन्य सर्व बस सुरक्षित ठिकाणी हलविल्या. त्यामुळे मोठी हानी टळली.

गुन्हेगार की व्यावसायिक स्पर्धा
पार्किंगच्या ठिकाणी सभोवताली दगडी भिंत असून, प्रवेशद्वारालगतच भिंतीच्या आतल्या बाजूनेदेखील काही बस उभ्या होत्या. एका बसला प्रारंभी आग लागल्याने जळीतकांडाचा संशय व्यक्त केला जातो. त्या दिशेने पोलिसदेखील तपास करीत आहेत. त्याचबराेबर अनेक वर्षांपासून एचएएलसाठीच्या बसेस याच ठिकाणी उभ्या असतात, मात्र यापूर्वी अशी दुर्घटना घडलेली नाही, त्यामुळे यामागे व्यावसायिक स्पर्धेतूनही हे कृत्य घडल्याचाही संशय अाहे. अनेक कंपन्यांनी कामगार वाहतुकीसाठी निविदा भरल्या हाेत्या. त्यातून ‘माताेश्री’ची निविदा मंजूर झाली.

सर्व दिशेने तपास सुरू
^पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या वाहनांना रात्रीच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अागीबाबत फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविण्यात आलेले आहेत. हेतुपुरस्सर कोणी बस जाळली का, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. - रमेश पिंपरे, पोलिसनिरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे

काेट्यवधींचे नुकसान
पार्किंगमध्ये उभ्याअसलेल्या बसेसला आग लागल्याची घटना समजताच घटनास्थळी दाखल झालाे. आगीचे नेमके कारण समजले नसून, अागीमुळे पाच बस जळून खाक झाल्या. कंपनीचे काेट्यवधींचे नुकसान झाले. - राजमल चोरडिया, मातोश्रीट्रॅव्हल्स