आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी 50 काेटींच्या कर्जउभारणीच्या हालचाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी याेजनेसाठी प्रथम नाशिककरांवर करवाढीचा वरवंटा फिरवणाऱ्या महापालिकेने अाता ५० काेटींचे कर्ज काढण्याचा विचार सुरू केला अाहे. सिंहस्थासाठी मंजूर साडेतीनशे कोटी रुपयांच्या निधीपैकी ५० कोटी रुपयांचे कर्ज निव्वळ स्मार्ट सिटीचा हप्ता भरण्यासाठी वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. 

महापालिकेत भाजपची सत्ता असून, माेदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्यात प्रामुख्याने अार्थिक अडचण येत अाहे. या याेजनेसाठी पाच वर्षात एक हजार काेटी उपलब्ध हाेणार असून, त्यात केंद्र शासन ५०० काेटी तर राज्य शासन २५० काेटी रुपये देईल. 

राज्य शासनाइतकेच पैसे महापालिकेला द्यायचे असून, अडीचशे काेटींचा पाच वर्षांत विचार केला तर दरवर्षी ५० काेटींचा हप्ता महापालिकेच्या वाट्याला येत अाहे. दरम्यान, स्मार्ट सिटीतील कामासाठी निधी उभारणीसाठी घरपट्टीत १८ टक्के तर पाच वर्षांत पाणीपट्टीत १२० काेटींची वाढ स्थायी समितीने मंजूर केली. ही धग कायम असताना अाता स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने ५० काेटींचे कर्ज उचलण्याची तयारी केली अाहे. यामुळे स्मार्ट सिटीची याेजना एकप्रकारे पालिकेवर बाेजा ठरणार अाहे. 

असा अाहे कर्जाचा भार 
सिंहस्थासाठी शासनाने साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. सिंहस्थ कामासाठी २६० कोटी तर घरकुल याेजनेसाठी ९० काेटी मंजूर अाहे. सिंहस्थासाठी मंजूर असलेल्या कर्जापैकी ९५ कोटी रुपयांचे कर्ज उचलले अाहे तर हुडकोने मंजूर केलेल्या कर्जापैकी २५ कोटी रुपये उचलले आहेत. हुडकोचे कर्ज फक्त घरकुलांसाठीच खर्च करता येणार असून, दाेन्ही मिळून १२० काेटी कर्जाची उचल झाली अाहे. दरम्यान, सिंहस्थासाठी मंजूर कर्जाची उचल करण्याची गरज नाही. कर्ज उचलण्याची गरज नसल्यामुळे महापालिकेची पत वधारण्याची अाशा असताना अाता स्मार्ट सिटीसाठी कर्ज उचलण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे विराेधक अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. 
बातम्या आणखी आहेत...