आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या ५० काेटींच्या कर्जाला हिरवा कंदील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेने रस्ते वा अन्य कामांसाठी हाेणा-या भूसंपादनाकरिता ५० काेटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला असून, १५ वर्षांत परतफेड करण्याच्या अटीवर १०. २५ टक्के व्याजदराने बँक अाॅफ महाराष्ट्रने पालिकला कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला अाहे. संबंधित बँकेचा प्रस्ताव पालिकेला परवडण्याजाेगा असल्याने स्थायी समितीच्या सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात अाला अाहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८ अाॅगस्ट २०१२ मध्ये ४५० काेटींच्या कर्जाची विविध टप्प्यात उभारणी करण्यास महासभेने मंजुरी दिली हाेती. २० जानेवारी २०१५ मध्ये ४५० काेटी कर्ज उभारणीसाठी अावश्यक मालमत्ता तारण ठेवण्यासाठी अनुमती देण्यात अाली. दरम्यान, १८ मार्च ५० काेटींच्या कर्ज उभारण्यासाठी तत्त्वता मान्यता देण्यात अाली. त्यासाठी स्पर्धात्मक निविदेद्वारे व्याजदर मागवण्याचा निर्णय झाला. यात चार बँकांनी सहभाग घेतला. त्यात बँक अाॅफ महाराष्ट्रचा प्रस्ताव अनुकूल हाेता.
बातम्या आणखी आहेत...