आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशकात १५ जुलैपूर्वी प्रथमच गंगापूर धरणाने गाठली पन्नाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन दिवसांपासून पावसाच्या धुवाधार बॅटिंगने सर्वच विक्रम मोडीत काढले आहे. गंगापूर धरणानेही दहा वर्षांत १५ जुलैपूर्वी प्रथमच ५० टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. धरणात मंगळवारी सायंकाळी वाजता जवळपास ६१ टक्के म्हणजे ३४१५ दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला होता. दारणातही ६७.४९ टक्के (४८२५ दलघफू), तर जिल्ह्यातील २३ प्रकल्पांत मिळून हा साठा ३२ टक्क्यांवर पोहाेचल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाने सर्वांनाच चिंता लागून असलेला वरुणराजा जूनमध्ये बरसता जुलैच्या दुसऱ्या अाठवड्यात वेगाने बरसला. तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती वेगाने सुधारली.
एरवी चांगला पाऊस होऊनही १५ जुलैपूर्वी ४७ टक्क्यांपेक्षा कमीच भरणाऱ्या गंगापूर धरणाने यंदा प्रथमच १२ जुलैलाच पन्नास टक्क्यांची पातळी गाठली आहे. शिवाय, तेवढ्यावरच राहाता थेट १० टक्के अधिक म्हणजे एकूण पाणीसाठा ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणात ३४१५ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले आहे. यापूर्वी केवळ २००७ मध्ये धरण ६८.१३ टक्के भरले होते. तेव्हा साठा हजार ८३६ दलघफू इतका होता. तेव्हा जिल्ह्यातही १५ जुलैपर्यंत सरासरी ५४५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर धरणाने थेट २०१६ मध्ये तेही १२ जुलैलाच ६० टक्के पातळी गाठली. त्या तुलनेत यंदा पाऊसही १२ जुलैपर्यंत सरासरी अवघा ३८४.९ मि.मी. म्हणजे ३५.८२ टक्के इतकाच झाला आहे.

मागील वर्ष हे पालिकेसाठी अत्यंत टंचाईग्रस्त ठरले. वर्षभरासाठी पालिकेला ३२०० दलघफू पाणी आरक्षित ठेवले होते. यंदा १२ जुलैलाच धरणात ३४१५ दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणजे पालिकेच्या मागील आरक्षणापेक्षाही जादा पाणी धरणात उपलब्ध झाल्याचे पाटबंधारे विभागांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

२००७ते २०१६ या दहा वर्षांच्या कालावधीत १५ जुलैपर्यंत सर्वाधिक कमी पाऊस हा २०१२ मध्ये झाला होता. तेव्हा सरासरी अवघा १६३ मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातही केवळ १०.५५ टक्के म्हणजे ५९४ दलघफू पाणी शिल्लक होते.
बातम्या आणखी आहेत...