आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील निर्णय गल्लीपर्यंत पाेहाेचेना, गरजूंना दिलासा मिळेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाेव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून एक हजार अाणि पाचशेच्या नाेटा चलनातून रद्द केल्याची घाेषणा केल्यानंतरच्या प्रत्येक दिवशी बँकांपुढे नाेटा बदली करून घेण्यासाठी लांबच लांब रांगा पहायला मिळत हाेत्या. बँका, पाेस्टासमाेरील ही गर्दी कमी व्हावी याकरिताचे दरराेज नवनवे निर्णय घेतले जात असून त्याची माहिती अंमलबजावणी मात्र कासवगतीने हाेत अाहे. रात्री टिव्ही चॅनल्सवर बातम्या दिसत असल्या तरी बँकांत मात्र असे अादेश पाेहाेचलेले नसल्याने बँकांच्या अधिकाऱ्यांतही अंमलबजावणीबाबत संभ्रम पहायला मिळताे अाहे. यामुळेच दिल्लीतील निर्णय अंमलबजावणीकरीता गल्लीपर्यंत पाेहाेचेना अाणि सामान्य गरजूंना दिलासा मिळेना, अशी स्थिती पहायला मिळते अाहे.
रद्द झालेल्या नाेटा बदलून घेण्यासाठी पंतप्रधानांनी पन्नास दवसांची मुदत दिली अाहे असे असले तरी सामान्य लाेक राेजच्या गरजेपाेटी नाेटा बदली करण्यासाठी बँकांत रांगा लावून तीन तास रांगेत उभे राहिल्याचे, चलन तुटवड्याने बाजारपेठा ठप्प झाल्याचे भीषण चित्र गेल्या अाठवड्यात पाहायला मिळत हाेते. मात्र या रांगा कमी व्हाव्यात याकरिता सरकारकडून दरराेज नवनव्या उपाययाेजना केल्या जात असून, बाेटाला शाई लावण्याच्या निर्णयानंतर बँका, पाेस्टासमाेरील रांगा लक्षणीय घटल्याचे दिसून येत अाहे. दिवसागणिक घेतले जाणारे वेगवेगळे निर्णय नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतले जात असले तरी अद्याप अनेक निर्णय हे सायंकाळी टीव्ही चॅनलवर पाहायला मिळतात, मात्र बँकांकडे याची माहितीच उपलब्ध नसते, अशी स्थिती असते.

बाेटावर शाई, पण अंमलबजावणीच नाही : नाेटाबदली केल्यानंतर बाेटावर शाई लावण्याचा निर्णय जाहीर झाला, पण दुसऱ्या दिवशी स्टेट बँकेकडे शाईच नव्हती तर बँक अाॅफ महाराष्ट्रकडे ही शाई अजूनही लावली जात नाही. शाईचा तुटवडा असल्याचे कारण यामागे असल्याचे बँकांच्या सूत्रांनी सांगितले.

पेट्राेल पंपांवरस्वाइप करून मिळणार राेकड : एटीएमकाम करीत नाहीत अाणि बँकांबाहेर माेठ्या रांगा अाहेत. यामुळे पेट्राेलपंपांवर क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाइप करून रक्कम उपलब्ध हाेईल, अशी घाेषणा झाली. मात्र, पेट्राेलपंपावर अशी सुविधाच उपलब्ध नाही. जिल्ह्यातील किसान सेवा केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या पंधरापैकी चार केंद्रांवरच ही सुविधा उपलब्ध, त्यातही हे पंप राज्यमार्ग पाेहाेचत नाहीत अशा दुर्गम ठिकाणी अाहेत. शहरवासियांना या घाेषणेचा दिलासा नाही.

ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याची मागणी
बँकांसमाेरनाेटा बदली करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तासन््तास उभे राहत असून, देशात काही जणांचा मृत्यूही झाल्याच्या बातम्या अाम्ही पाहत अाहाेत. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या पाल्यांना त्यांच्या नाेटा बदली करून मिळाव्यात, अशी सवलत देण्यात यावी. अापल्या पालकांचे अाधारकार्ड किंवा पॅनकार्डची झेराॅक्स दाखवून किंवा अर्जासाेबत जाेडून नाेटा बदली करून दिल्या जाव्यात, अशी मागणी अरुण वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाठविलेल्या पत्राव्दारे केली अाहे.

लग्नासाठीच्या स्वत:च्याच रकमेकरिता खेटे
लग्नाकरिताअडीच लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार असल्याचा निर्णय प्रसिद्धिमाध्यमातून जनतेला कळला असला तरी अद्याप काेणत्याही मार्गदर्शक सूचना बँकांकडे अालेल्या नाहीत. यामुळे लग्नासाठी रक्कम हवी असलेल्यांना मात्र बँकांतून खाली हात परतावे लागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या अाहेत.

शनिवार ज्येेष्ठ नागरिकांसाठीच
शनिवारी केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच बँकांत नाेटा बदलून मिळतील, असे शुक्रवारी सायंकाळपासून टिव्ही चॅनल्सवर दाखविले जात हाेते. मात्र, प्रत्यक्षात अनेक बँकांत मध्यरात्रीपर्यंत अशा सूचनाच प्राप्त झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मात्र संभ्रमाची स्थिती हाेती.
सीबीएस परिसरातील स्टेट बँकेच्या या एटीएमवर कॅश डिपाॅझिट मशिनमध्ये नाेटा जमा करण्यासाठी रविवारी रात्री नागरिकांनी रांग लावली हाेती.
बातम्या आणखी आहेत...