आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाबंदीमध्ये ५६ वाहनांची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या खून, लूट अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी कारवाई सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला अाहे. खुद्द पाेलिस अायुक्तांनीच पुढाकार घेतलेल्या या माेहिमेत ३६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अाली. तसेच, दाेन तडीपार गुन्हेगारांच्या घरांची तपासणी करण्यात अाली.
शनिवारी रात्री पाेलिसांनी राबविलेल्या माेहिमेत ५६ वाहनांची तपासणी करण्यात अाली अाहे. पाेलिस अायुक्तालयाच्या परिमंडळ मध्ये नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नियमित कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी ऑलआऊट अादी माेहिमा सुरू आहेत. शनिवारी रात्री राबविलेल्या माेहिमेत दोन तडीपार गुन्हेगारांच्या घरांची तपासणी करण्यात अाली. दहा संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात अाली. अंबड टी पॉइंट येथे नाकाबंदीमध्ये ३४ वाहनांची तपासणी करण्यात अाली. याचप्रमाणे हॉटेल, लॉजचीही तपासणी करण्यात आली. अंबड परिसरात तडीपारांच्या घरांची तपासणी करण्यात आली. ११ संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

सिडको हॉस्पिटल येथे ५६ वाहने तपासून यापैकी १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार तपासले. संजीवनगरात ११ वाहनांवर कारवाई झाली. पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, अतुल झेंडे वरिष्ठ निरीक्षकांसह कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.

दरम्यान, शहरातील भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, आडगाव, म्हसरूळ, मुंबई नाका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नुकतीच दोन गटांमध्ये दंगल झाल्याने या परिसरात कोम्बिंग, ऑलआऊट नाकाबंदीची गरज आहे.

दाेन दिवसांत ३६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सकारात्मक पाऊल उचलत कोम्बिंग, नाकाबंदी, ऑलअाऊट अशा धडक माेहिमा सुरू केल्या अाहेत. गेल्या दोन दिवसांत या कारवाईत तब्बल ३६ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. परिमंडळ मध्ये ही कारवाई व्यापक स्वरूपात सुरू आहे. मात्र, परिमंडळ मध्ये किरकोळ कारवाई सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ३२७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शहरात दोन सराईत आणि तडीपार असलेल्या निखिल गवळी, अर्जुन आव्हाड यांचा खून झाल्यानंतर शहरात तडीपार गुन्ह्यांचा वावर असल्याचे उघडकीस आले आहे.