आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान संमेलनासाठी नाशिकमधून ५७० जणांची नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकमधून अातापर्यंत जवळपास ५७० जणांनी नोंदणी केली आहे. यात साहित्य रसिकांसह संत नामदेवांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याच्या उद्देशानेही अनेकांनी नोंदणी केली आहे.
पंजाब येथे साहित्य संमेलन होत असताना मराठी माणूस तेथे पाहोचेल का? तिथे मराठीस संमेलन कशासाठी? बरं जायचेच असले,तर तेथे कसे पोहोचावे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर साहित्य महामंडळाने तोडगा काढत नाशिक बांद्रा येथून दोन रेल्वेंची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध ठिकाणच्या शाखांमध्ये घुमानला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी नोंदणी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या एकूण नोंदणीचा आकडा आता ५७० पर्यंत पोहोचला आहे.
या ५७० जणांमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली आहे ती बारा बलुतेदार संघाच्या अशोक स्तंभावरील कार्यालयात. साहित्याबरोबरच संत नामदेवांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याच्या उद्देशाने येथे तब्बल नागरिकांनी नोंदणी केल्याचे बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्येही प्रतिनिधी नोंदणी करत असल्याने हा आकडा नक्कीच वाढणार आहे अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
याबरोबरच नाशिकच्या पुनर्गठित झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतही जणांनी नोंदणी केली आहे. तर नाशिकरोडमधूनही २२ साहित्यप्रेमी घुमानच्या संमेलनासाठी जाणार आहेत.
विशेष म्हणजे नाशिकमधील एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचा यंदाचा अभ्यासदौरा हा घुमान संमेलनाकडेच निघाला आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी शिक्षकांसह ४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. अशी आतापर्यंत ५७० जणांनी नोंदणी केली आहे. हा आकडा निश्चितच येत्या तीन-चार दिवसांमध्ये वाढेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.