आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा पथके तपासणार शहरात विद्यार्थ्यांची सुरक्षितता; इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर विशेष नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिल्लीतील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येनंतर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांची तपासणी करण्यासाठी शिक्षण मंडळाने सहा पथकांची निर्मिती केली आहे. 
 
सध्या संपूर्ण देशभर हे प्रकरण गाजत असून प्रद्युम्न नावाच्या या विद्यार्थ्याची शाळेच्या बाथरूममध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली होती. शाळेच्या बसवाहकानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आल्याने पालकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले अाहे. या घटनेनंतर शाळांमध्ये मुले सुरक्षित आहेत का, अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे. शहरातील काही शाळांमध्ये यापूर्वी विद्यार्थ्यांत हाणामारी, त्यांचे अपहरण, दप्तरामध्ये सापडलेल्या घातक वस्तू अशी प्रकरणे घडली अाहेत. विद्यार्थ्यांकडून हाेणारा मोबाईलचा वाढता वापरही धाेकादायक असल्याचा इशारा समाजशास्त्रज्ञांनी वारंवार दिला अाहे. 
 
अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने प्रयत्न केलेे जात असून, त्यानुसारच शाळांची तपासणी केली जाणार आहे. त्यात शाळेत सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत का, शाळेत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेने नोंदणी केलेली आहे का, त्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का, हे पडताळून विद्यार्थ्यांशीही संवाद साधला जाणार आहे. या पडताळणी मोहिमेत विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांंवर नजर राहणार असून यासाठी सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे तपासणी पथक शहरातील शाळांमध्ये जाऊन अचानक तपासणी करणार आहे. 
 
सुरक्षिततेच्या दृष्टीने होणार पडताळणी 
‘रायन’च्याप्रकरणानंतरविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांची तपासणी केली जाणार आहे. या पडताळणीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहितीही तपासणार आहाेत.
 -नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी 
 
..तर मुख्याध्यापकांना बजावणार नोटीस 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. अशा सुविधा नसतील तर मुख्याध्यापकांना जबाबदार धरून नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

स्पिनरचा खेळ ठरतोय धोकादायक 
गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पिनरच्या खेळाची क्रेझ वाढू लागली आहे. रेडियम, लायटिंग, प्लास्टिक, लोखंडी असे विविध प्रकारचे स्पिनर थेट शाळेमध्ये आणले जात अाहेत. हे स्पिनर फिरवताना दुसऱ्याला लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन हाणामारी होत असल्याच्या घटना वाढू लागल्याने हे स्पिनर धोकेदायक ठरत आहेत. या प्रकाराकडे शाळा व्यवस्थापनासह तपासणी पथकानेही गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...