आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शौचालय नसल्‍याने निमगाव ग्रामपंचायतचे 6 सदस्‍य अपात्र, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शौचालय नसल्याने मालेगाव तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हा निकाल दिला. २०१५ साली हे सदस्य निवडून आले होते. 
 
निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय असल्याबाबत ग्राम सभेत ठराव करणे बंधनकारक आहे. मात्र तसा ठराव करण्यात न आल्याने अनिल हिरे यांनी या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यानुसार चौकशीत तथ्य आढळून आल्याने भिका हिरे, सरला जगताप, सुनंदा हिरे, सोनाली हिरे, बेबीबाई ठाकरे, सविता अहिरे या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...