आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानदंश लसीकरणावर वर्षाला ६० लाखांचा खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोकाट श्वानांच्या चाव्यावर नागरिकांकडून रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या लस खरेदी करण्यासाठी वर्षाला ६० लाखांचा निधी खर्च होत आहे. इतर औषधांच्या खरेदीपेक्षाही श्वानदंश लस खरेदीपोटी आरोग्य विभागाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. जिल्हा रुग्णालयात महिन्याला सुमारे १२० व्हायल(प्रतिबंधक लस)ची आवश्यकता भासते, तर पिसाळलेल्या श्वानदंशासाठी वर्षभरात ४९१ (एआरएस) प्रतिबंधक लसींची अावश्यकता असल्याची स्थिती आहे. राज्यात हा खर्च सुमारे २० कोटींच्या पुढे असण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने मोकाट आणि पिसाळलेले श्वान मारण्यास परवानगी दिली आहे. याबाबत नागरिक आणि प्राणीप्रेमी संघटनांमध्ये मतभिन्नता आहे. प्राणीप्रेमापोटी संघटना यास विरोध करतात, तर श्वानदंश झालेल्या नागरिकांकडून या आदेशाचे स्वागत होत आहे. श्वानांची संख्याच लक्षणीय असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शासकीय दवाखान्यात ही लस जरी मोफत मिळत असली तरी ही लस खरेदी करण्यासाठी शासनास दरवर्षी सुमारे ६० लाखांचा खर्च एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी येतो. मोकाट श्वानांची संख्या कमी झाल्यास रेबीज प्रतिबंधक लस खरेदीलादेखील आळा बसेल. उरलेल्या निधीतून गरजू रुग्णांसाठी इतर औषधांची खरेदी करणे शक्य होणार आहे.

मृत्यूलाच आमंत्रण
श्वान चावल्यानंतर वेळीच उपचार केले तरी रेबीजचा जीवाणू मेंदूमध्ये सुप्त राहतो. काही रुग्णांना एक वर्षात अथवा दहा वर्षांनंतरही सुप्त जीवाणूमुळे संसर्ग होतो. यामध्ये संबंधित रुग्णाला डार्क रूममध्ये ठेवले जाते. पिसाळलेल्या श्वानाप्रमाणे लक्षणे दिसून येतात.'

असा होतो पुरवठा
जिल्हा रुग्णालयात महिन्याला १२० व्हायल लागतात. यामध्ये एआरव्ही महिन्याला हजार, तर वर्षाला ६० हजार व्हायल लागतात. पिसाळलेल्या श्वानांच्या दंशासाठी एआरव्हीच्या महिन्याला ५०० व्हायल लागतात. या खरेदीसाठी शासनास वर्षाला ६० लाखांचा खर्च येतो.