आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: जिल्ह्यातील 60 टक्के आधारकार्ड ‘डिअॅक्टिव्ह’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के लोकांच्या आधारकार्डमध्ये नावात फोटोमध्ये चुका असल्याने त्यांचे आधारकार्ड ‘डिअॅक्टिव्ह’ असल्याची शक्यता अाधारशी संबंधित कंपनीकडून वर्तवली जात आहे. यामुळे अनेक नागरिकांना बँक खाते उघडण्यासह पेन्शन मिळण्यातही अडचण येत असल्याचे चित्र आहे. अाधारबाबत ही गाेंधळाची स्थिती असताना दुसरीकडे आधार केंद्रचालकांकडून आधारकार्ड ‘अपडेट’ करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. 
 
आधार क्रमांक पॅनकार्ड, बँक खाते ऑनलाइन हयातीच्या दाखल्यांशी जोडणी करताना या नागरिकांना तुमचे आधारकार्ड ‘डिअॅक्टिव्ह’ असल्याचा मेसेज येत आहे. यानंतर अपडेटसाठी आधार केंद्रावर गेल्यानंतर करेक्शनसाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...