आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट; शहरात डेंग्यूचा जाेर वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात जुलै, अाॅगस्टपेक्षा यंदा सप्टेंबरमध्ये गेल्या पंधरा दिवसात १६५ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले, त्यातील ६२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अाराेग्य विभाग पावसाकडे बाेट दाखवत स्वत:ची मान साेडवून घेताना दिसत अाहे. 
 
मागील दाेन वर्षांच्या तुलनेत डेंग्यूचा जाेर कमी असला तरी, तीव्रता कायम अाहे. डेंग्यूमुळे दाेन वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविकेच्या पतीचा बळीही गेला. दरम्यान, जुलै अाॅगस्टमध्ये काहीसा अाटाेक्यात असलेल्या डेंग्यूने डाेके वर काढले अाहे. ते १५ सप्टेंबर या काळात डेंग्यूचे संशयित १६५ रुग्ण आढळले असून, संबंधित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविले आहेत. जुलैमध्ये डेंग्यूचे ९४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी १४ डेंग्यूबाधित हाेते. ऑगस्टमध्ये डेंग्यूची लागण झालेल्या संशयित रुग्णांचा आकडा वाढून तब्बल १७४ इतका झाला दरम्यान, ऑगस्टमध्ये ९७ डेंग्यू बाधित अाहेत. सप्टेंबरच्या पंधरा दिवसांत प्रयाेगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार ६२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जुन्या नाशकात डेंग्यूमुळे मृत पावलेल्या शेख आयेशा या बालिकेच्या रक्तनमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 
 
१९६ स्वाइन फ्लूचे रुग्ण 
जानेवारीते अातापर्यंत स्वाइन फ्लूचे २८६ संशयित रुग्ण आढळले. त्यात १९६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली अाहे. त्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत महापालिका बाह्य क्षेत्रात १८५ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले अाहे. त्यातील ३६ जणांचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ६१ इतकी झाली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...