आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात बसविणार अाता ६५० स्पीडब्रेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  महापालिका क्षेत्रात काेट्यवधी रुपये खर्चून रिंगराेडपासून तर काॅलनीराेडपर्यंत रस्त्यांचे जाळे मजबूत केले जात असताना या चकाचक रस्त्यावर भरधाव वाहन दामटण्याच्या बेशिस्तीमुळे लाेकांचे जीणे मुश्कील झाले अाहे. महापालिकेकडे ६५० स्पीडब्रेकर बसवण्याबाबत असलेले मागणीपत्र लक्षात घेत सर्वप्रकारचे निर्बंध उठवून लाेकांच्या जीविताशी संबंध असल्यामुळे तत्काळ स्पीडब्रेकर टाकावे, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत एकमुखाने केली. दरम्यान, अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी गांभीर्य लक्षात घेत शाळा, दवाखाने, काॅलनी परिसरातील रस्त्यांवर प्राधान्यक्रमानुसार स्पीडब्रेकर बसवले जातील, असे सांगितले. 
स्थायी समितीची सभा सभापती सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत यशवंत निकुळे यांनी स्पीडब्रेकर नसल्यामुळे चांगले रस्ते अपघाताला कारण ठरल्याकडे लक्ष वेधले. दुचाकीस्वार गैरफायदा घेऊन वेगाने गाड्या दामटतात. पादचाऱ्यांकडे बघत नाही. त्यामुळे वेगाला चाप लावण्यासाठी स्पीडब्रेकर गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर प्रकाश लाेंढे खुद्द सभापती शेख यांनी अापल्या प्रभागातील रस्त्यांवर स्पीडब्रेकरसाठी किती दिवसांपासून पाठपुरावा सुरू अाहे यावर प्रकाश टाकला. दरम्यान, स्पीडब्रेकर संपूर्ण शहराच्या दृष्टीनेच कळीचा मुद्दा असल्याचे लक्षात घेत अायुक्तांनी तातडीने यासंदर्भात खराेखर जेथे गरज असेल तेथे स्पीडब्रेकर बसवण्याबाबत धाेरण ठरवले जाईल, असे स्पष्ट केले. स्पीडब्रेकर बसवण्याची खराेखरच जेथे गरज अाहे त्यात शाळा, रुग्णालय, काॅलनीचा समावेश हाेईल, असे सांगितले. त्यानंतर शहर अभियंता सुनील खुने यांनी स्पीडब्रेकरबाबत ६५० मागणीपत्र अाल्याचे सांगितले. सर्वाेच्च उच्च न्यायालयाच्या निर्बंधानुसार स्पीडब्रेकरबाबत काही मर्यादा अाहे. यापूर्वी अडीचशे स्पीडब्रेकर अल्पावधीत हटवले गेले. दरम्यान, स्पीडब्रेकर बसवण्याचा निर्णय एकटा पालिका घेत नसून यात पाेलिसांची माेठी भूमिका असते. पालिकेने स्पीडब्रेकर बसवले भविष्यात दुर्दैवाने अपघात झाला तर स्पीडब्रेकर बसवणाऱ्यावर कारवाई हाेऊ शकते. ही बाब लक्षात घेत पाेलिस अायुक्त, पालिका अारटीअाे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित समितीच स्पीडब्रेकरबाबत निर्णय घेत अाहे. त्यासाठी लवकरच बैठक हाेणार अाहे. या समितीने नुकतीच शहरातील रस्त्यांची पाहणी करून स्पीडब्रेकरची काेठे गरज अाहे याचा अाढावा घेतल्याचेही खुने यांनी स्पष्ट केले. 

स्थायीत काेण लावणार स्पीडब्रेकर? : स्थायीवर१६ सदस्य असले तरी, या समितीचा कारभार चार ते पाच वजनदार सदस्यांकडेच अाहे. हेच सदस्य प्रत्यक्ष विषयावर अापले म्हणणे मांडण्याच्या नावाखाली बराच वेळ माइकचा ताबा घेऊन बसतात. यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील बहुदा अखेरची स्थायी समिती सभा असेल म्हणून यंदा विषयपत्रिकेवरील प्रस्ताव साेडून अापल्या मनाला वाटेल ते वर्षभरातील प्रश्नांचा अाढावा घेण्यास सुरुवात झाली. लांबलचक भाषणबाजी करणाऱ्यांना स्पीडब्रेकर लावणार काेण असा प्रश्न उपस्थित झाला. 

विनाचर्चा श्वान निर्बीजीकरणासह ठेक्यांना मंजुरी 
स्थायीसमिती सभेत अकारण इतर विषयांवर चर्चा हाेत असताना श्वान निर्बीजीकरणाचा ९० लाखांचा तब्बल ३० टक्के वाढ असलेला ठेका मंजुरी, पावसाळ्यात उन्मळून पडलेली झाडे उचलण्याचे कंत्राट, मखमलाबाद येथील कचरा डेपाेचे अारक्षण, कर्मचाऱ्यांच्या विमा याेजनेचा प्रस्ताव याबाबत फारशी चर्चा करता मंजुरी देण्यात अाली. धक्कादायक म्हणजे, फाळके स्मारकातील विश्रामगृह उपहारागृह लायसन्स फीद्वारे देण्याचा प्रस्ताव चक्क ११ सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी मंजुरीचा प्रयत्न झाला. अखेरची स्थायी समिती असल्यामुळे विनाचर्चा मंजुरीची घाईही स्पष्ट झाली. 

 
बातम्या आणखी आहेत...