आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक रिंगणात सात उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेना व काँग्रेसकडून दोन, तर मनसे, भाजप व राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अमावास्येच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजेच्या आत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली.

सर्वप्रथम शिवसेनेच्या वंदना बिरारी यांनी अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते अजय बोरस्ते हे त्यासाठी सूचक व अनुमोदक आहेत. सेनेकडूनच सचिन मराठे यांनी दुसरा अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे व राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले. भाजपकडून रंजना भानसी यांनी अर्ज दाखल केल्याने सभापतिपदासाठी प्रयत्न करणार्‍या प्रा. कुणाल वाघ यांना माघार घ्यावी लागली.
ढिकले यांचे तीन अर्ज : सभापतिपदासाठी शिवसेना व भाजपमध्ये दावे-प्रतिदावे सुरू असताना मनसेकडून राहुल ढिकले यांनी तब्बल तीन अर्ज दाखल केले. तांत्रिक कारणास्तव अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी ही दक्षता घेतल्याचे सांगितले जाते.