आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडला रेल्वेचा 7 तास मेगा ब्लाॅक, 4 मुख्य फलाटांवरून वाहतूक सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - मनमाड रेल्वे जंक्शनमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलासाठी चार अवजड लोखंडी गर्डर टाकण्यासाठी गुरुवारी सात तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. सायंकाळी ५.१५ पर्यंत हे काम सुरू हाेते. मात्र, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. फलाट क्रमांक ते या मुख्य लोहमार्गांवरून वाहतूक सुरळीत सुरू होती.
 
मात्र, दुपारनंतर नांदेड, औरंगाबादकडून येणाऱ्या ते गाड्यांना सुमारे ४५ मिनिटे अन्य रेल्वेस्थानकात थांबविण्यात आले. सुमारे शंभरावर रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी, कार्यशाळेचा स्टाफ, सुरक्षारक्षक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून उभे होते. १४० टन वजन उचलणारी महाकाय क्रेन, दाेन इतर लहान क्रेन यांच्यासह दुर्घटनाराेधक साधनसामग्री असलेली विशेष रेल्वे असा लवाजमा त्यासाठी स्थानकात तैनात होता.
 
सकाळी १०.३० च्या सुमाराला या मेगा ब्लॉकच्या कामाला प्रारंभ झाला. रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ते वर हा नवीन पादचारी पूल टाकण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत दोन महिन्यांपूर्वी या पादचारी पुलासाठी उभारण्यात आलेल्या फाउंंडेशनवर फलाट क्रमांक पर्यंत लोखंडी गर्डर बसविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा सव्वा तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या अंतर्गत फलाट आणि वर महाबली क्रेनच्या मदतीने अतिभव्य गर्डर बसविण्यात आले. हे काम पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने कडक बंदोबस्त ठेवला हाेता. मेगा ब्लॉकच्या काळात फलाट क्रमांक पासून पुढे लोखंडी गर्डर बसविण्यात आले. मेगा ब्लॉक सुरू करण्यापूर्वी या मार्गावरील ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
 
उद्या पुन्हा मेगा ब्लाॅक
आताफलाट क्रमांक ते वर नवीन गर्डर बसविण्याचे काम करण्यासाठी उद्या, नाेव्हेंबर राेजी पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येईल, त्यावेळी मात्र मेन लाइनवर हे काम असल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी व्यक्त केली आहे.
 
फक्त तीन गाड्या थांबल्या इतर स्थानकांत
नांदेडवरूनयेणारी नांदेड अृतसर सचखंड एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास अनकाई रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली. हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस सुमारे २० मिनिटे पानेवाडी रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली. तर नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही गाडी अनकाई रेल्वेस्थानकात २५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. याव्यतिरिक्त अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील प्रवासी गाड्यांची वाहतूक फलाट १, २, अाणि वरून सुरळीत सुरू होती.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...