आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू संशयित सात मृतांचा अहवाल निगेटिव्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या सात रुग्णांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. आठ दिवसांत चार संशयितांचा स्वाइन फ्लू कक्षात मृत्यू झाला. या सर्व मृतांचा वैद्यकीय अहवाल सोमवारी (दि. २१) प्राप्त झाला असून, सातही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सांगितले. यामुळे स्वाइन फ्लू विषयीची भीती कमी झाली आहे. कक्षात सध्या सहा संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंहस्थात स्वाइन फ्लू वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा आरोग्य विभागाला फायदा झाला. दि. ते २१ सप्टेंबर या काळात ५७ रुग्ण स्वाइन फ्लू कक्षात दाखल झाले. यापैकी ३५ जणांना स्वाइन फ्लू नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले, तर १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते.

सहा रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले. त्यात अपर पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. तर, स्वाइन फ्लूचा संशय असलेल्या सात रुग्णांचा मृत्यू झाला. यातील चार रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, तीन रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे.
सध्या पाच महिला आणि एक पुरुष रुग्णावर कक्षात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी सोमा धुळे (वय ६०, रा. करंजखेड), सुमन जगताप (वय ६८), बेबी चौधरी (वय ६५) रझिया पिंजारी (वय ४७) या स्वाइन फ्लूग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी तिघांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. होले यांनी दिली.

स्वाइन फ्लू नियंत्रणात
स्वाइन नियंत्रणात आहे. बहुतांश रुग्ण हे खासगीमध्ये उपचार घेतात. इतर आजारांचे निदान होत नसल्याने रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात पाठवला जातो. कक्षामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक