आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या हजार 7 पदांना हिरवा कंदील, अनेक विभागांमध्ये नवीन पदांची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अार्थिक खडखडाट अपुऱ्या मनुष्यबळामुळे मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरणाऱ्या महापालिकेच्या १४ हजार ४७२ कर्मचाऱ्यांच्या अाकृतिबंधाला महासभेने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. विशेष म्हणजे, नवीन अाकृतिबंधात हजार ३८२ पदे नव्याने वाढणार असून, अाता त्यात शासन किती पदांना मंजुरी देते किती पदांना कात्री लावते, याकडे लक्ष लागले अाहे.
नाशिक महापालिकेचा गेल्या वर्षी ‘ब’ वर्गात समावेश झाला असून, पालिकेची पदाेन्नती झाल्यामुळे अाता नवीन पदांची निर्मिती करणेही पर्यायाने अाले हाेते. दुसरीकडे, पालिकेत सेवानिवृत्त हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत हाेती. शासन निर्बंधामुळे पालिकेत थेट नाेकरभरतीला परवानगी नसून, ठेकेदारीकरण वा कंत्राटी माध्यमातून पालिका अनेक सेवा कशाबशा चालवत अाहेत. खासकरून अास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी हाेत नसल्यामुळे पालिकेला नाेकरभरतीत अडचणी येत असल्याचाही दावा अनेक वेळा प्रशासनाने केला. दरम्यान, ‘ब’ वर्गानुसार पालिकेने १४ हजार ४७२ कर्मचाऱ्यांचा अाकृतिबंध महासभेवर ठेवला हाेता. यापूर्वी पालिकेत ७०९० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून, अाता त्यात नवीन जुनी अशी ७३८२ पदांची वाढ करण्यात अाली.

अास्थापना खर्चाची अडचण : महापालिकेचाअास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नाेकरभरतीत अडचण अाहे. भविष्यात हजार नवीन पदांना शासनाने मान्यता दिली तरी अास्थापना खर्च कमी झाल्याशिवाय भरतीवरील निर्बंध उठणार नाही. त्यात सातव्या वेतन अायाेगाचा बाेजा पडल्यास अास्थापना खर्च वाढणार अाहे. अशा परिस्थितीत पालिकेला उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावे लागणार अाहे.

प्रशासकीय - उपअायुक्त २, सहायक अायुक्त ७, स्वीय सचिव २, अधीक्षक १६, लघुलेखक १७, सहायक अधीक्षक ५८, वरिष्ठ लिपिक ८८, कनिष्ठ लिपिक ३०२, टेलिफाेन अाॅपरेटर ७, नाईक/ दफ्तरी २१, शिपाई २८९. तांत्रिक- अधीक्षकअभियंता (स्थापत्य) १, कार्यकारी अभियंता - २४, उपअभियंता - ४१, शाखा अभियंता ५०, सहाय्यक अभियंता १३८, कनिष्ठ अभियंता १०७, शिफ्ट इंजिनिअर ३३, सहाय्यक फिल्टर प्लॅन्ट अाॅपरेटर १७, सिव्हिल ड्राॅप्समन २७, इलेक्ट्रिशियन ८५, ट्रेसर २१, फिल्टर अाॅपरेटर २९, मिस्तरी ९२, पाइपलाइन फिटर ७९, प्लंबर ३९, पंप अाॅपरेटर ११८, वायरमन ७२, व्हाॅलमन २०२, केमिकल मजदूर ४०, वाहनचालक १२१, विद्युत हेल्पर ८६, सुरक्षारक्षक १४१, वाॅचमन ९६, माळी ७८, जीवरक्षक ३५, नाट्यगृह अाॅपरेटर १६, रंगमंच सहाय्यक २५. लेखा- संगणकअाॅपरेटर ४१, उपलेखापाल १६, कनिष्ठ लेखापाल १४. अग्निशामक- फायरमन१५३, लिडिंग फायरमन ३४, सब अाॅफिसर २९. अाराेग्य- वैद्यकीय- सफाई कर्मचारी २४२५, स्वच्छता मुकादम २७३, स्वच्छता निरीक्षक ४५, गंगापट्टेवाले २०, स्टाफ नर्स ४३३, परिचारिका १५९, वैद्यकीय अधिकारी ३०२, एक्स रे टेक्निशियन ५८, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ ५८, बहुउद्देशीय सेवक ३३,मिश्रक ८०, वार्डबाॅय १२०, अाया ८५, मलेरिया फिल्ड वर्कर २३७, सुपेरिअर फिल्ड वर्कर ७९

२७४ पदे नव्याने वाढणार
महापालिकेतअाता २७४ नवीन पदे वाढणार असून, खासकरून प्रदूषण, जनसंपर्क अधिकारी, मुख्य उद्यान अधीक्षक, तारांगण व्यवस्थापक, पशुवैद्यकीय अधिकारी, मुख्य वाहनचालक, वाहतुकीसाठी अधीक्षक अभियंता, वायरलेस अाॅपरेटर, अाहार तंत्रज्ञ, पाेलिस शिपाई अादी काही नवीन पदे निर्माण हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...