आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73 गट, 146 गणांची 5 ला आरक्षण सोडत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा परिषदेचे बहुचर्चित ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांची आरक्षण सोडत 5 अॉक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या सात नगरपालिकांमुळे गटांच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता असून, ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकांचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

5 ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता एकाचवेळी त्या-त्या तालुक्यात आरक्षणाची सोडत चिठ्ठी पद्धतीने काढली जाईल. अनुसूचित जाती, जमाती मागास प्रवर्गातील स्त्रियांसह राखीव जागा निश्चितीसाठी सोडत पद्धतीचा अवलंब केला जाईल. प्रत्येक तालुक्यात त्यासाठी सभा आयोजित केली आहे. जागांच्या आरक्षणासाठी चक्रानुक्रम पद्धत राबविण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये 5 आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद आरक्षणांची सोडत काढण्यात येईल. त्याचवेळी प्रत्येक पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणांची सोडत ही त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणीच काढण्यात येईल. आतापासूनच इच्छुकांनी राजकीय गणिते जुळविण्यास आणि आरक्षणानुसार कुठे उमेदवारी करता येईल, यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी आपल्या गट-गणांबाबत माहितीही मिळविल्याची चर्चा आहे.

याठिकाणी निघणार आरक्षण
बागलाण(पंचायत समिती सभागृह), मालेगाव (प्रांत कार्यालय), नांदगाव (तहसील कार्यालय सभागृह), येवला (तहसील कार्यालय), चांदवड (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत), देवळा (पंचायत समिती कार्यालय), कळवण (पंचायत समिती), दिंडोरी (तहसील कार्यालय सभागृह), निफाड (बाजार समिती शेतकरी भवन), त्र्यंबकेश्वर (तहसील कार्यालय) तसेच पेठ , सिन्नर आणि इगपुरीचीही त्या-त्या तालुक्यातच आरक्षण सोडत जाहीर होईल.
बातम्या आणखी आहेत...