नाशिक - राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्यांच्या नऊ संघटनांना सोमवार (दि. 10) ते बुधवारी (दि. 12) सकाळी 6 वाजेपर्यंत 48 तासांचा देशव्यापी संप पुकारला आहे. जिल्ह्याच्या क्लिअरिंग हाउसची जबाबदारी सांभाळणार्या स्टेट बँकेच्या कर्मचार्यांचाही समावेश असल्याने दोन दिवसांत किमान 750 कोटींचे व्यवहार ठप्प होणार आहेत.
वेतनवाढीच्या मुद्यावर केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असून, यात जिल्ह्यातील 2750 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, बँक कर्मचारी आणि अधिकार्यांच्या संघटनांच्या वतीने नेहरू गार्डनजवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 10.30 वाजता द्वारसभा होणार आहे.