आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात डेंग्यूचे ७६ संशयित रुग्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ढासळती आरोग्य व्यवस्था चिंतेचा विषय ठरला असून, जुलै महिन्यात डेंग्यूचे तब्बल ७६ संशयित आढळले आहेत. त्यापैकी ३९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून, १५ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या महिन्यात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी साथरोग प्रतिबंधक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी होणार असताना जुलैमध्ये ७६ संशयित आढळले आहेत. गेल्या आठवड्यात शहरात तापाचे ११०५ रुग्ण, तर अतिसाराचे २७८, सर्दी, खोकला ६६, विषमज्वर १२, काविळीचे रुग्ण आढळले आहेत.
बातम्या आणखी आहेत...