Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | 76 thousand rupees robbered from petrolpump

दुचाकीला धडक देत लांबवली लाख 76 हजारांची रक्कम; पेट्रोलपंपावरील महिला कामगार जखमी

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 09:20 AM IST

पेट्राेलपंपावरील महिला कामगाराच्या दुचाकीला धडक देत तीन लाख ७६ हजारांची रक्कम चाेरट्यांनी लांबवल्याची घटना सोमवारी (दि.

  • 76 thousand rupees robbered from petrolpump
    इंदिरानगर- पेट्राेलपंपावरील महिला कामगाराच्या दुचाकीला धडक देत तीन लाख ७६ हजारांची रक्कम चाेरट्यांनी लांबवल्याची घटना सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता राणेनगर येथे घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुमन पेट्रोलपंपावरील कामगार नीलिमा शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार साेमवारी सकाळी ११ वाजता पंपाची तीन लाख ७६ हजारांची रक्कम अॅक्टीवा (एमएच १५ डीपी ८३२२) वरून पाथर्डी फाटा येथील अॅक्सिस बँकेत भरण्यासाठी जात असताना पांढऱ्या इंडिका कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. यादरम्यान कारचालकाने रक्कम असलेली बॅग लांबवली. या घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे, उपनिरीक्षक सुनील बोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. कामगार महिलेनेही नक्की कारचालकाने का अपघातानंतर झालेल्या गर्दीतील कुणी बॅगची चाेरी केली याबाबत संभ्रम व्यक्त केला. आठ दिवसांपूर्वी लाखलगाव येथील पंपचालकाने पेट्रोलियम कंपनीकडून मिळणारी विमा रक्कम हडप करण्यासाठी लुटीचा बनाव रचला होता. या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत.

Trending