आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीसाठी ८.५ टीएमसी विसर्ग, गंगापूर- दारणातून धरणामधून साेडले पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शनिवारी मध्यरात्रीपासून सतत सुरू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणात पाण्याची अावक वाढली अाहे. त्यामुळे सर्व धरणांचे एकत्रित पाणी येणाऱ्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १० हजार ९२५ क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू करण्यात अाला अाहे. यंदाच्या हंगामात जायकवाडीस जवळपास ८.५२६ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पाणलोट क्षेत्रामध्ये सोमवारी ८ ते ५ या वेळेत २६ मिमी पाऊस पडला. त्यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढत अाहे. त्यामुळे रविवारी २७४० क्युसेक वेगाने साेडण्यात अालेल्या पाण्याचा विसर्ग साेमवारी ३६४७ क्युसेक करण्यात आला. तर दारणामधील विसर्गही ८६०० हून ११ हजार ६८८ क्युसेक करण्यात अाला. पालखेडमधून ३५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे सर्वच पाणी नांदूर मधमेश्वरमध्ये येत असल्याने या बंधाऱ्यातून १० हजार ९२६ क्युसेकने विसर्ग सुरू अाहे. हे सर्व पाणी अाैरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणासाठी फायदेशीर ठरत अाहे.
छायाचित्र: नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडून त्यातून जायकवाडी धरणासाठी दाेन दिवसांपासून पाणी साेडले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...