आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 कॉलेज ‘एक्सलंट’, तर १० ठरले ‘व्हेरी गुड’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शैक्षणिक धोरण, भौतिक वैद्यकीय सुविधा, निकालाची उज्ज्वल परंपरा, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, कला क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, प्लेसमेंटची सुविधा.. अशा विविध शैक्षणिक निकषांवर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ मध्ये झालेल्या तपासणीत नाशिक विभागातील ५८ महाविद्यालये उत्तीर्ण ठरली. डिप्लोमाची महाविद्यालये ‘एक्सलंट’ (उत्कृष्ट), तर १० महाविद्यालयांना ‘व्हेरी गुड’ (उत्तम) असे मानांकन प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) पॉलिटेक्निक, डी. फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नोलॉजी हे पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. तंत्रशिक्षण मंडळ दरवर्षी मुंबई, पुणे, नागपूर आणि आैरंगाबाद या विभागातील महाविद्यालयांची तपासणी करते. २०१५ २०१६ या शैक्षणिक वर्षासाठी मार्चमध्ये मंडळाकडून नियुक्त समितीने महाविद्यालयांना भेटी देऊन तपासणी केली.

या तपासणीनंतर मंडळाच्या निकषांवर आधारित सुविधा दिल्या जातात की नाही, याच्या तपासणीनंतर अहवाल सादर केला जातो. त्यानंतर विहित निकष पूर्ण करणाऱ्या कॉलेजांना अनुक्रमे समाधानकारक, चांगले, उत्तम, उत्कृष्ट अशी श्रेणी दिली जाते. यात नाशिकच्या ५८ महाविद्यालयांची तपासणी झाली असून, त्यांना याप्रमाणे नामांकन देण्यात आले आहे.

जाहीर झालेल्या श्रेणींचा विद्यार्थ्यांना फायदा होईल
नवीन शैक्षणिकवर्षासाठी प्रवेश घेताना विद्यार्थी पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत असतो. चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा निर्णय घेताना एमएसबीटीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या श्रेणींचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल. डी.के. पाटील, प्राचार्य, एशियन फार्मसी कॉलेज
पुढे वाचा.. एमएसबीटीईतर्फे मिळाली श्रेणी
बातम्या आणखी आहेत...