आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीएसएनएल’च्या संपामुळे आठ लाखांची उलाढाल ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘बीएसएनएलबचाव’साठी ‘बीएसएनएल’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दाेनदिवसीय संपामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याने अाठ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत अाहे. ‘बीएसएनएल’चे कामकाज गुरुवार (दि. २३) पासून सुरळीत हाेणार असून, संपामुळे रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांत अाणि ग्राहक सेवा केंद्रांत गर्दी हाेण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, ‘बीएसएनएल’चे कॅबिनेट सेक्रेटरी राकेश गर्ग अाणि १९ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये येत्या सोमवारी (दि. २७) िदल्लीत बैठक हाेणार अाहे. त्यात गर्ग संघटनांच्या मागण्या जाऊन घेणार अाहेत. या संपात िजल्ह्यातील १५०० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामासह ग्राहक सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प झाले हाेते. संपादरम्यान नेटवर्कमध्ये काेणताही अडथळा अाला नाही. मात्र, ग्राहक सेवा केंद्रांत बिले भरून घेणे, मोबाइलचा रिचार्ज करून देणे, नवीन कनेक्शनचे वाटप झाल्याने दाेन िदवसांत अाठ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत अाहे.

केंद्र सरकारने दखल घेतल्याने केला संप

^अाम्हीयापूर्वी लाक्षणिक संप केला हाेता. परंतु, केंद्र सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा संप करावा लगला. ‘बीएसएनल’ची प्रगती झाली पाहिजे हीच अामची भूमिका अाहे. िदल्लीत २७ एप्रिलला ‘बीएसएनएल’चे कॅबिनेट सचिव राकेश गर्ग हे १९ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत बैठक घेणार अाहेत. लक्ष्मणशिंदे, परिमंडल अध्यक्ष, भारतीय टेलिकाॅम एम्प्लाॅइज युनियन